CHB Professor at Shivaji University ...! 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात सीएचबी प्राध्यापक...!

संदीप खांडेकर

कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठ स्तरावर सीएचबी प्राध्यापकांची आता नियुक्ती केली जाणार आहे. महिन्याकाठी निश्‍चित मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी शिक्षकांची (हंगामी सहाय्यक प्राध्यापक) अडचण झाली असून, महिन्याकाठी हातात पडणाऱ्या मानधनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका तासिकेमागे केवळ पाचशे रुपये मिळणार आहेत. यंदा ही वेगळी प्रथा विद्यापीठाच्या उंबरठ्यावरून अधिविभागांत प्रवेश करत आहे. 
एका वर्षाच्या करारावर कंत्राटी प्राध्यापकांची पदे भरण्यात येतात. एका प्राध्यापकाला महिन्याकाठी रोख 32 हजार 600 रुपये मानधन दिले जाते. विद्यापीठात या पदांचा आकडा 144 असला तरी गतवर्षी केवळ 79 कंत्राटी प्राध्यापक विविध अधिविभागांत कार्यरत राहिले. त्यांची मुदत मेमध्ये संपुष्टात आली. एक वर्षाचा करार असला तरी नऊ ते दहा महिन्यात कंत्राटी प्राध्यापकांना काम करायला मिळते. कोरोनाच्या संकटात प्राध्यापकांच्या मानधनालाही कात्री लावण्यात आली. विशेषतः कायमस्वरूपी प्राध्यापकांची संख्या लक्षात घेता अधिविभागातील विविध कामांचा बोजा कंत्राटी प्राध्यापकांवर असतो. त्यातून त्यांची सुटका नसते. तासिका तत्त्वावरील पदे विद्यापीठात भरल्यास संबंधित प्राध्यापकांचा तासिकांपुरताच कार्यभार राहील. ते अन्य कामास नकारघंटा वाजवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
नॅक मूल्यांकनाच्या तोंडावर तासिका तत्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती केली जाणार आहे. तसा निर्णय व्यस्थापन परिषदेत घेण्यात आला आहे. छोट्या संवर्गातील आरक्षित पदे भरण्याबाबत ऑगस्ट 2019 ला शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे यंदा कंत्राटी पद भरतीला स्थगिती दिली आहे. 2015 चा विचार करता 11 महिन्यांची मुदत संपल्यानंतर एक महिन्यांचा ब्रेक देऊन प्राध्यापकांच्या सेवा पुढे सुरु ठेवल्या होत्या. तसा निर्णय विशेषाधिकाराखाली करणे शक्‍य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

पुढील आदेशापर्यंत कंत्राटी नियुक्तीची मागणी 
शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत पूर्वीप्रमाणेच कंत्राटी प्राध्यापकांच्या नियुक्तीची अंमलबजावणी करावी. चार ते पाच वर्षे ते सेवा बजावत आहेत. अडचणीच्या काळात विद्यापीठाने प्राध्यापक व त्याच्या कुटूंबांचा सहानभूतीपूर्वक विचार करायला हवा, असा सूर विद्यापीठ वर्तुळात आहे. 

शासकीय नियमांप्रमाणे कंत्राटी प्राध्यापकांची भरती यंदाही व्हायला हवी. तरच त्यांचा दर्जा राखला जाईल. तासिका तत्वावरील त्यांची नियुक्ती त्यांचे अवमुल्यन करणारी ठरेल. 
प्रा.डॉ. एन. बी. गायकवाड, सदस्य व्यवस्थापन परिषद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT