Spices Dryfruits ‌ sakal
कोल्हापूर

कोल्‍हापूर : स्वस्त पाकिटांची ग्राहकांना भुरळ

स्वस्तात ‘मस्त’म्हणून भारतीय गरम मसाले, ड्रायफ्रूटस्‌ रस्त्याशेजारी विक्री

अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर : स्वस्तात ‘मस्त’म्हणून भारतीय गरम मसाले, ड्रायफ्रूटस्‌ रस्त्याशेजारी विक्री करताना दिसतात. हे मसाले खरेच स्वस्त झाले का, हा प्रश्‍न निर्माण होतो. खरेतर दहा वर्षांत मसाल्यांचे प्रतिकिलो दर १८० ते २४०० रुपये किलोपर्यंत गेले. मिरी, तमालपत्रीसारखे काही मसाले जसे महाराष्ट्रातून येतात तशाच पद्धतीने केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर भारत, दक्षिण आशिया, मध्यपूर्व देश, आखाती देशातून मसाले येतात. मसाला हा जंगल, शेतीतून मार्केटपर्यंत येतो, तेव्हा ‘कॉस्टिंग’वाढते. ते महाग होतात; मात्र अलीकडे कोल्हापूर शहरात अन्‌ आत येणाऱ्या मुख्य रस्त्यांशेजारी काही लोक मसाले, ड्रायफ्रूटस्‌ची विक्री करताना दिसतात. त्यांच्याकडून मसाल्याची पाकीट स्वस्त मिळतात. जो ग्राहक असे मसाले घेतात, ते अनेकदा फसले जातात.

वरून हा मसाला खराखुरा वाटतो; पण मसाल्याच्या आतमध्ये नेमका भेसळीचा कोणता घटक वापरला जातो, हे समजत नाही. यासाठीची शोध घेणारी यंत्रणा शासनाकडे आहे; मात्र तिथंपर्यंत कोणी पोहोचत नाही. काही कंपन्यांचे ब्रॅंडस्‌ वापरून घरात किंवा शेडस्‌मध्ये मसाला तयार केले जातात. पंख्याखाली किंवा उन्हात वाळवून तिथेच ब्रॅंडेड पॅकिंगसारखी हुबेहूब पॅकिंग केली जातात. अशा पॅकिंगमधील मसाला हा २० ते २५ रुपयांनी स्वस्त विकला जातो. अशी बोगस मसाले तयार करणारी यंत्रणा महाराष्ट्रात आहे, तशीच बाहेरील राज्यातही आहे. तेथून असे मसाले विक्रीसाठी छोट्या शहरात, तालुकास्तरावरील आठवडी बाजारात येतात.

सणासुदीला अधिक मागणी

कोणत्याही सणाला मसाल्यांची मागणी अधिक असते तेव्हा अशी यंत्रणा कार्यरत होते. अशी पॅकेटस्‌ घेऊन रस्त्याशेजारी, मंडईत, आठवडी बाजारात ती वितरित केली जातात. विशेषत: कोल्हापूर परिसरात नोव्हेंबर ते मे अखेरपर्यंत प्रत्येक घरात चटणी तयार केली जाते. तेव्हा चटणीसाठी भारतीय गरम मसाल्यांचा अधिक वापर होतो. तेव्हा मंडईत मसाले विक्रीसाठी काही विक्रते दिसतात. त्यांच्याकडून असे मसाले कमी भावात घेतले जातात. या मसाल्यात भेसळ झालेली दिसत नाही. वास, चव, रंग खऱ्याखुऱ्या मसाल्यासारखी असते; पण जेव्हा हा मसाला चटणीत किंवा जेवणात वापरला जातो, तेव्हा चवीत बदल होतो. काही मसाले खूप वर्षांचे असतात. असे जुने मसाले नव्या मसाल्यात टाकूनही विक्री केली जाते.

खराखुरा मसाला शोधणार कोण?

मसाला स्वस्त आहे म्हणून तो विकत घेतला जातो; पण अशा मसाल्यात अनेकदा भेसळीचे पदार्थ वापरून विक्री केली जाते. मसाला जसा हा मॉल्स्‌, सुपरस्टोअर्स, किराणा दुकानात विकला जातो, तशाच पद्धतीने तो रस्त्याशेजारी बसूनही विक्री होते. अशा मसाल्यात भेसळीचे कोणते घटक असतात? स्वस्त म्हणून ते कसे विकले जातात? मसाले कुठून येतात? मसाल्यातील घातक घटकांमुळे शरीरावर नेमका कोणता परिणाम होतो, याचा घेतलेला हा वेध.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Sonawane : पुस्तकी ज्ञानापलीकडची शाळा! अशोक सोनवणे गुरुजींनी घडविले ३००० हून अधिक बालकलाकार

Satara News: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी येताच काळाचा घाला, ८ तासांची चिमुकली पित्याच्या अंत्यदर्शनासाठी | Sakal News

Pune News: इमारतीवरून तोल गेल्याने मुलाचा मृत्यू; पतंग उडविताना कात्रजमध्ये घटना, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा!

Solapur University: शॉकिंग अपडेट! पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब; संशोधनातील आकडे पाहून थक्क व्हाल

Crime News : नोटाबंदीनंतरही ४०० कोटींच्या जुन्या नोटा? घोटी पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT