cheating crime case  
कोल्हापूर

मुलीच्या नोकरीसाठी गमावले 54 लाख

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः मुलीला नोकरी लावण्याच्या अमिषाने निवृत्त शासकीय मुद्रणालय येथील निवृत्त व्यवस्थापकास 54 लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद जनार्दन शंकर आयरे (वय 73, रा. लाईन बजार, कसबा बावडा) यांनी न्यायालयात दिली.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नांवे ः विक्रम गजानन कुष्टे (वय 40), वर्धा विक्रम कुष्टे (दोघे रा. ए वॉर्ड), कुमार देसाई, गुरूनाथ राजाराम देसाई (वय 70, रा. जुनी शाहूपुरी), प्रशांत घोरपडे (वय 35), मकरंद सबजी (वय 40), मंजिरी जोशी (वय 32, रा. मुंबई), हेर्लेकर (वय 45, पूर्ण नाव माहित नाही), शासकीय वित्त अधिकारी मोडक (वय 40, पूर्ण नाव पत्ता माहित नाही), शिक्षण विभाग अधिकारी देशमुख (वय 40, पूर्ण नाव पत्ता माहित नाही), शिक्षण प्रसारक मंडळ वडगावचे मुख्याध्यापक डी. बी. पाटील (वय 50, रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले) अशी आहेत.

जनार्दन आयरे नागपूर येथे शासकीय मुद्रणालय येथे व्यवस्थापक होते. त्यावेळी त्यांची संशयित विक्रम कुष्टे याच्याशी ओळख झाली. ते मुलीसाठी नोकरीच्या शोधात होते. याची माहिती मिळताच विक्रम व त्याचे साथिदार संशयित वर्धा कुष्टे, कुमार देसाई, गुरूनाथ देसाई, प्रशांत घोरपडे, मकरंद सबजी, मंजिरी जोशी, हेर्लेकर, मोडक, देशमुख, डी.बी. पाटील या सर्वांनी मुलीला शिक्षण संस्थेत नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. शिक्षण संस्थेत रिक्त असलेली खोटी बनावट कागदपत्रे दाखवली. संशयितांनी खोटी नावे व शासकीय पदावर काम करत असलेले विविध हुद्दे असल्याची खोटी ओळख सांगून आणि आदेश दाखवून विश्‍वास संपादन केला. त्या सर्वांनी डिसेंब 1999 ते 14 नोव्हेंबर 2013 या कालावधित त्यांच्याकडून 54 लाख रूपये घेतले. नोकरी मिळत नसल्याचे पाहून आयरे यांनी त्यांच्याकडे दिलेल्या पैशाची परत मागणी केली. त्यावेळी बॅंक खात्यावर रक्कम नाही हे माहित असतानाही संशयितांनी त्यांना बॅंकाचा धनादेश देऊन फसवणूक केली. यानंतर आयरे यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली त्यावेळी त्यांना संशयित विक्रम व वर्धा या दोघांनी धमकी दिली असे आयरे यांनी न्यायालयात दिलेल्या फिर्यादेत म्हटेल आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT