Checkpoints and flying squads set up to trap liquor smugglers 
कोल्हापूर

मद्य तस्करांना ट्रॅप करण्यासाठी तपासणी नाके व भरारी पथके सज्ज

राजेश मोरे

कोल्हापूर ः थर्टी फस्टचा पार्श्‍वभूमीवर मद्याची तस्करी करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे. सीमा भागात तपासणी नाक्‍यासह भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. 
कोरोना संकाटनात हे वर्ष संपले. वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात येणारा नाताळ सणासह त्यापाठोपाठ वर्षाला निरोप देणारा थर्टी फस्टचा जल्लोषासाठी अनेकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. या संधीचा फायदा उठविण्यासाठी गोवा राज्यातून मद्याची तस्करी करून त्यातून मोठा फायदा उठविण्याचा प्रयत्न करणारी तस्करांची यंत्रणाही कामाला लागली आहे. वाहनांत चोरटे कप्पे तयार करायचे. प्रथमदर्शी हे वाहन रिकामे असल्याचे भासवून चोरकप्प्यातून मद्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करणारी यंत्रणाही सक्रीय झाली आहे. अशावर लगाम घालण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणावर केले आहे. मद्य तस्करांकडून अशा पद्धतीचे वेगवेगळे फंडे वापरले जावू लागलेत. अशा तस्करांचा बिमोड करण्यासाठी थर्टीफस्टच्या पार्श्‍वभूमीवर विभागानेही कंबर कसली आहे. 

गोवा, महाराष्ट्र राज्याच्या सीमा भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार तपासणी नाके (चेक पोस्ट) तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीला दोन भरारी पथकेही नेमण्यात आली आहेत. त्याद्वारे मद्य तस्करांवर नजर ठेवली जात आहे. त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन सध्या त्यांच्या काय हलचाली (टेटस्‌) आहेत याचीही माहिती विभागाकडून केली जात आहे. तस्कराबरोबर बेकायदेशीर मध्यसाठा, मद्यविक्री करणाऱ्या यंत्रणेवरही भरारी पथक लक्ष ठेऊन आहे. 

मद्य तस्करी रोखण्यासाठी तपासणी नाके ः 
महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवरून होणारी मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तिलारी, आंबोली ते आजरा मार्ग, दाजीपूर आणि गगनबावडा येथे तपासणी नाके तैनात करण्यात आले आहेत. तेथे 24 तास अधिकाऱ्यासह सात जणांचे पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक बापूसाहेब चौगुले यांनी दिली. 

चौकट ः 
या वर्षातील राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 
दाखल गुन्हे *जप्त वाहने* जप्त मुद्देमाल मद्यासह*दाखल गुन्ह्यातील संशयित 
1193*102*2 कोटी 35 लाख 29 हजार 673 *861 
----------------- 

थर्टीफस्टच्या पार्श्‍वभूमीवर सीमाभागात चेकपोस्टसह भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. मद्य तस्करी, त्याचा बेकायदेशीर साठा अगर विक्री करणाऱ्या विरोधात तक्रारी देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. 
- बापूसाहेब चौगले (अपर पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग) 
संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT