Chhatrapati Sambhaji Maharaj Divisional Sports Complex Floating steel tank kolhapur sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : क्रीडा संकुलमध्ये फ्लोटिंग स्टील टॅंक

६ कोटी खर्च; जलतरण तलावाचा प्रश्न मिटणार, मैदान विद्युतीकरण होणार

सुयोग घाटगे

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावाच्या समस्येचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. तलावात फ्लोटिंग स्टील टॅंक (तरंगणारा) बसवण्यात येणार आहे. यासाठी ६ कोटींचा खर्च होणार आहे.

क्रीडा संकुलाच्या कामांना उशिरा का होईना; पण सुरुवात होत आहे. दोन तलाव, डायविंग प्लॅटफॉर्म, बैठक व्यवस्था अशी रचना असणाऱ्या या ठिकाणी परिसरातील पाण्याचे उमाळे फुटल्याने कोट्यवधी खर्चून बांधलेल्या तलावात पक्षी जलविहार करत होते. सध्या या तलावात स्टीलचा फ्लोटिंग टॅंक बनवण्यात येणार आहे. उमाळ्यातून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

येथील मुख्य मैदानाचा वापर वाढला आहे. फुटबॉलसह मैदानी खेळांचा सराव होत आहे. मुख्य मैदानावर विद्युतीकरण, मोकळ्या जागेत मल्टिस्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स बनवण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची मागणी केली असून, ती मंजूर झाली आहे. एकूण १२ खांब असून एलईडी अधिक प्रकाश देणारे दिवे लावण्यात येणार आहेत. या दिव्यांमुळे कमी प्रकाशात अथवा अंधारातही सराव करणे शक्य होणार आहे. संकुलाच्या आवारातील मोकळ्या जागेत मल्टिस्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स बनवण्यात येणार आहे. ज्यात ६ बॅडमिंटन कोर्ट, विविध मार्शल आर्टस्, टेबल टेनिससह अन्य इनडोअर खेळांच्या सरावासह राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेणे शक्य होणार आहे. या संकुलात बैठक व्यवस्था, चेंजिंग रूम, शॉवर रूम, स्टोअर सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

असा असेल स्टील टॅंक

  • ३ ते ५ इंच जाडीचा हा टॅंक

  • आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनविण्यात येणार

  • बंगळूर व पुणे येथील तज्ज्ञ समितीने भेट देऊन निरीक्षणे नोंदवली

  • सध्याच्या तलावात येणाऱ्या उमाळ्यांचा होणार निचरा

संकुलातील त्रुटी दूर करून अद्ययावत सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने काम सुरू केले आहे. संपूर्ण संकुल राष्ट्रीय मानकांच्या सुविधांनी सज्ज करून खेळाडूंना संकुल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Lift Collapsed: नालासोपाऱ्यात मोठी दुर्घटना! सात मजली इमारतीची लिफ्ट कोसळली, ८ जण गंभीर जखमी; Video Viral

Petrol Diesel Tax: पेट्रोल-डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय! 31 ऑक्टोबरपासून डिझेलवरील टॅक्स वाढवला; पेट्रोल-डिझेल आता कितीला?

ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ! ८ वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून वॉरंट जारी

Viral Bears: ४ अस्वलांचा पिकअपमध्ये धुमाकूळ! स्नॅक्स अन् बिअरचे कॅन पळवले! VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Marathi News Live Updates : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात १२ व्या आरोपीला बेड्या; हरियाणामधून अटक केलेल्या अमरला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी

SCROLL FOR NEXT