Shiv jayanti esakal
कोल्हापूर

युद्धकलेचा थरार अन् हलगी, घुमक्याचा ठेका; कोल्हापुरात दिमाखात शिवजयंती

आबालवृद्धांसह महिलांनी मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके, प्रबोधनात्मक फलकांनी सजलेल्या बैलगाड्या व ऐतिहासिक वेशभूषेत नटलेले बाल मावळे, अशा वातावरणात कोल्हापुरातील (Shivaji Peth kolhapur) शिवाजी तरूण मंडळातर्फे (Shivaji Tarun Mandal) काढण्यात आलेली मिरवणूक अविस्मरणीय ठरली. हलगी व घुमक्याच्या ठेक्यात मिरवणूक मार्ग कडाडला, तर आबालवृद्धांसह महिलांनी मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कोरोना (Corona) हद्दपार झाल्याची भावना निर्माण करत कार्यकर्त्यांनी शिव विचारांचा जागर घातला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे मिरवणूक झाली नाही. यंदा मात्र कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढण्याचा पवित्रा घेतला. उभा मारुती चौकातून पालकमंत्री सतेज पाटील, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जयश्री जाधव काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर आर. के. पोवार मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीस सुरुवात झाली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे मिरवणूक झाली नाही. यंदा मात्र कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढण्याचा पवित्रा घेतला.

हातात भगवे ध्वज व डोक्यावर फेटा घातलेल्या युवकांचा उत्साह अवर्णनीय होता. बैलगाड्यांवर प्रबोधनात्मक संदेशाचे फलक लावून मंडळाने प्रबोधनाची परंपरा जोपासली. धनगरी ढोलाच्या ठेक्यावर मिरवणूक पुढे पुढे सरकत होती. ऐतिहासिक वेशभूषेतील बाल मावळे घोड्यावर स्वार होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाबाई, रणरागिणी ताराराणी यांच्यासह मावळ्यांच्या वेशभूषा त्यांनी साकारल्या होत्या.

सचिव महेश जाधव, सहसचिव सुरेश जरग, लालासाहेब गायकवाड, अजित खराडे, मोहनराव साळोखे, रविकिरण इंगवले, अजय इंगवले, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय मोरे, उपाध्यक्ष करणसिंह पाटील, अनिकेत सरनाईक, सचिव अभिजीत कोडलकर, सहसचिव करणे मोरे, अभिजित राऊत, शाहू पाटील, रवींद्र साळोखे, रणधीर खराडे, ओंकार गवळी, शिवाजी जाधव, मोहन साळोखे, लाला गायकवाड, विक्रम जरग, श्रीकांत भोसले, अजित ठाणेकर मिरवणुकीत सहभागी झाले होते.

फलकांवरील संदेश असे...

  • - बेरोजगार तरुण वर्गासाठी सरकारी नोकरी भरती झालीच पाहिजे

  • - स्वार्थी राजकारणापायी कोल्हापूरचा विकास होणार काय?

  • - कोल्हापूरला विकास गंगा आणायची असेल तर कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे

  • - महापुरामुळे भोगाव्या लागणाऱ्या गंभीर परिस्थितीवर शासनाने कायमस्वरूपी उपाय शोधलाच पाहिजे

  • - गड किल्ल्यांचे संवर्धन करून पर्यटन विकासाला चालना देऊया

खंडोबा-वेताळ तालीम मंडळाचे मर्दानी आखाड्याचे वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्या शिष्यगणांनी शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर करत शिवभक्तांची मने जिंकली ऐंशीवर्षीय ठोंबरे यांनी पट्टा फेक सादर केली. मिलिंद सावंत, किरण जाधव, शिवतेज ठोंबरे, केदार ठोंबरे, शिवानी ठोंबरे, शाहू सावंत, अथर्व जाधव, सरला भोसले, जिजाऊ जाधव यांनी प्रात्यक्षिके सादर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT