Uddhav Thackeray esakal
कोल्हापूर

दरवर्षी आम्ही तुम्हाला किती वेळा भेटायचं : उद्धव ठाकरे

गाव म्हणून तुम्ही निर्णय घ्या. पुनर्वसन करायची जबाबदारी माझी.

अर्चना बनगे

शिरोळ भागातील पूरग्रस्त महिलांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, पुनर्वसनाबरोबरच आम्हाला रोजगार ही पाहिजे.

कोल्हापूर : गाव म्हणून तुम्ही निर्णय घ्या. पुनर्वसन करायची जबाबदारी माझी. दरवर्षी आम्ही तुम्हाला भेटत राहणार, दरवर्षी सगळं वाहून जाणार ,तुम्ही असं बाहेर राहणार हे बरोबर नाही. हे असं आयुष्य नाही जगायचं. त्यावर पुनर्वसन हा एकमेव इलाज आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी शिरोळ ( Shirol) पूरग्रस्त पाहणी दरम्यान केले‌.

Chief-Minister-Uddhav-Thackeray-shirol-Nrusinhwadi-Kolhapur-Flood-Visit-akb84

यावेळी शिरोळ भागातील पूरग्रस्त महिलांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, पुनर्वसनाबरोबरच आम्हाला रोजगार ही पाहिजे. आमच्या गावात दिवसाला शंभर रुपये हजेरी आहे. तुम्ही जी मदत देणार आहात ती आम्हाला किती दिवस पुरणार? यासाठी कायमस्वरूपी यावर मार्ग काढावा, अशी विनंती शिरोळ भागातील पूरग्रस्त महिलांनी केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसीकरण संदर्भातही महिलांशी संवाद साधला. लसीकरण पूर्ण करून घ्या , मास्क वापरा. गावाच्या पुनर्वसनाची मागणी मार्गी लावू. गाव म्हणून तुम्ही ठरवा करा. निश्चितच तुमच्या मागणीचा विचार केला जाईल असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे व्यक्त केले.

नृसिंहवाडी , शिरोळ भागाची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री आता कोल्हापूरची पाहणी करण्यासाठी निघाले आहेत. थोड्याच वेळात ते कोल्हापूर,शाहूपुरी, कुंभार गल्ली या ठिकाणी पोहोचतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : 'सिंचन अनुशेष निर्मूलनाचे जनक' प्रा. बी. टी. देशमुख यांचे देहावसान; तब्बल तीस वर्षे विधीमंडळाचे केले प्रतिनिधीत्व

Porsche Car Accident Case : अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

कोण होती 'मोगली गर्ल'? २०१७ ला वयाच्या ८ व्या वर्षी सापडली जंगलात, १८ वर्षी निधन

बुलेट छब्या गेला! बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीची एक्झिट; अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसागर, थार अन् लाखोंची बक्षिसे जिंकली...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर विरुद्ध दोषारोप निश्चित; जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT