Chief Ministers meeting today for de pollution of Panchganga
Chief Ministers meeting today for de pollution of Panchganga 
कोल्हापूर

पंचगंगा प्रदुषणमूक्तीसाठी आज मुख्यमंत्र्यांची बैठक 

सुनील पाटील

कोल्हापूर : पंचगंगा प्रदुषण रोखण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जिल्ह्यातील लोकप्रतिनधी, जिल्हाधिकारी यांच्यासह प्रदुषण नियंत्रण मंडळ, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेचे अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. ही बैठक सायंकाळी 6 वाजता मुंबई येथे होणार असून लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी या बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित राहतील. तर इतर अधिकारी व पदाधिकारी व्हीसीद्वारे या चर्चेत सहभाग घेणार आहेत. 

लॉकडाऊनदरम्यान स्वच्छ आणि प्रदुषणमूक्त असणारी पंचगंगा आता नव्याने विविध कारणामुळे प्रदुषित होत आहे. पंचगंगा नदीमध्ये ठिकठिकाणी मृत माशांचा खच पडत आहे. साखर कारखान्यांची मळी सोडल्यामुळे प्रदुषणामध्ये वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी आज विशेष बैठक बोलावली आहे. पंचगंगा प्रदुषणास कारणीभूत असणाऱ्या सर्व घटकांची व गावांची माहिती घेतली जाणार आहे.

इचलकरंजीमधील सांडपाणी व प्रक्रिया केलेले पाणी सोडण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. तसेच, यासाठी विशेष निधीची घोषणा केली जाण्याची शक्‍यता आहे. 

हे पण वाचा - अंडी उबवण केंद्रात प्रशिक्षण: ‘ब्लॅक ॲस्ट्रोलॅप’ व ‘गिरिराजा’ पक्षी उपलब्ध 
 
पंचगंगा प्रदुषणमूक्तीसाठी दैनिक सकाळने वारंवार आवाज उठवला आहे. सध्या पंचगंगा नदीत मासे मृत होत आहे. याबाबतही वेळोवेळी वृत्त प्रसिध्द करुन जिल्हा प्रशासन, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे लक्ष वेधले आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT