Chiller falling instead of notes in hand ...! 
कोल्हापूर

हाती नोटांऐवजी पडतेय चिल्लर...!

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : आबालवृद्धांना संस्कृती, संस्काराची शिकवण देणाऱ्या वासुदेवावरही कोरोनाचे संकट आले आहे. लॉकडाउनमुळे लोकं दारातही थांबवत नाहीत, तरीही आम्ही पोटाचा धंदा आहे म्हणून फिरतोय, असे तो सांगतो. एवढंच नव्हे, तर नोटांऐवजी चिल्लर हातात पडत आहे. बारामतीतून आलेला हा वासुदेव म्हणजे रोहन मालोजी गदाई सांगत होता. 18 वर्षांचा हा तरुण अलीकडे उपनगरातील गल्लोगल्ली फिरत आहे. चिपळ्या वाजवत "तुळस हिरवीगार मानवा, तुळस हिरवीगार' हा अभंग म्हणत हा वासुदेव एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत निघून जात आहे. अभंगातून संस्काराची पेरणी करीत आहे. 

एसएससी बोर्ड ते आयसोलेशन रिंग रोडवरील मनीषा नगरात आज या वासुदेवाने त्यांच्या अभंगाने संपूर्ण गल्ली मंगलमय केली. गेली दोन दिवस हा वासुदेव या परिसरात फिरत होता. अनेकांनी त्याच्याकडे पाहिले की खिशात हात जात होता.

चिल्लर त्याच्या हाती टेकवली जात होती. कुतूहलाने त्याला विचारले तर "लॉकडाउनमुळे लोकं दारातही थांबवून घेत नाहीत, त्यांनाही कोरोनाची भीती आहे,' असे सांगतच त्याने पुन्हा चिपळ्या वाजविण्यास सुरवात केली. हिरवा झब्बा, पांढरी विजार, कंबरेला गुलाबी ओढणी आणि डोक्‍यावर मोरपिसांचा टोप घालून गल्लोगल्ली फिरणारा आधुनिक युगातील वासुदेव आणि त्याच्या सोबत असलेला त्याचा मामा ओंकार साळोखे दोघेही मूळचे माळेगाव-बारामतीतील आहेत.

रोहनचे शिक्षण आठवी, तर ओंकारचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. पाच वर्षांपासून ते कोल्हापुरात आले आहेत. बोंद्रेनगर पेट्रोलपंपाजवळ झोपडीत राहतात. सकाळी लवकर उठून वासुदेवाच्या रूपात ते गलोगल्ली फिरत आहेत. पूर्वी अशा वासुदेवाची झोळी सुपाने भरली जात होती. पुढे पाच-दहाची नोट देऊन यांना खूश केले जायचे. आता मात्र त्यांच्या हाती चिल्लर पडत आहे. 

आई-वडिलांना धरून राहावे 
रोज 300 रुपये मिळवत असल्याचे ओंकारने सांगितले, तर आम्ही अभंगातून लोकांना शहाणे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे रोहनने सांगितले. आपण वेगवेगळं राहायला लागलोय, आई-वडिलांनाही सोडायला लागलोय. आई-वडिलांना धरून राहिलो पाहिजे, चारचौघांना धरून राहिलो पाहिजे, असे आम्ही अभंगातून सांगतोय, असेही सांगायला रोहन विसरला नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT