कोल्हापूर

पूरग्रस्तांना भरपाईसाठी विमा कंपन्यांनी टाळाटाळ केल्यास कडक कारवाई करा

पूरग्रस्तांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्यानंतर त्यांनी विमा कंपन्यांबाबतची भूमिका स्पष्ट केली.

संदीप खांडेकर

कोल्हापूर : पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात विमा कंपन्यांनी (insurance company) टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje) यांनी केली. चिपळूण येथे पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागास संभाजीराजे यांनी भेट देऊन केली. त्यावेळी पूरग्रस्तांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्यानंतर त्यांनी विमा कंपन्यांबाबतची भूमिका स्पष्ट केली. (chiplun flood)

संभाजीराजे म्हणाले, नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात विमा कंपन्या आडमुठी भूमिका घेत आहेत. पूरामध्ये शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचेच नुकसान झाले आहे. आधीच लॉकडाऊनमुळे डबघाईला आलेले व्यवसाय, या पुरामध्ये झालेल्या नुकसानामुळे अधिकच संकटात सापडले आहेत. मात्र, याकडे कुणी फारसे लक्ष देताना दिसत नाही. विमा कंपन्या याचा गैरफायदा घेत असून, नुकसान भरपाई देण्यास अवास्तव कारणे देऊन टाळाटाळ करत आहेत."

नुकसानाची योग्य तितकी भरपाई विमा कंपन्यांकडून करण्यात यावी, यासाठी शासनाने यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. चिपळूण, महाड, कोल्हापूर, सांगली, सातारा पूरग्रस्त सर्वच भागात विमा कंपनी यांनी भरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात मी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT