Chitra Wagh टिम ई सकाळ
कोल्हापूर

कोल्हापुरात जाहीर सभेवर दगडफेक; चित्रा वाघ यांचा आरोप, म्हणाल्या..

'तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांवर दाखवा असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही'

सकाळ डिजिटल टीम

'तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांवर दाखवा असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही'

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान, काल भाजपाच्या चित्रा वाघ या भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आल्या असता त्यांच्या सभेवर दगडफेक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सभा सुरु असताना काहीजणांनी त्यांच्या दगडफेक केली असंही त्या म्हणाल्या आहेत. शहरातील मुक्त सैनिक वसाहत येथील जाहीर सभेत हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रीतसर फिर्याद नोंदवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

यासंदर्भात चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्या म्हणतात, वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारता. आज संध्याकाळी भाजपा उत्तर कोल्हापूर उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ सभेत मी बोलत असतांना तिथे दगडं मारण्यात आली. तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांवर दाखवा असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा, असं वाघ यांनी खडासावून सांगितलं आहे.

दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचारासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ कोल्हापुरात आल्या आहेत. शहरातील मुक्त सैनिक वसाहत आणि राजारामपुरी येथे त्यांची जाहीर सभा होती. मात्र यावेळी सभेवर काहीजणांनी दगडफेक केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT