election
election sakal
कोल्हापूर

चौंडेश्वरी सूतगिरणी निवडणूकीत सत्तारुढ पॅनेलचा धुव्वा

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील चौंडेश्‍वरी सहकारी सुतगिरणीच्या अत्यंत चुरशीने झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी चौंडेश्‍वरी पॅनेलने सत्तारुढ पॅनेलचा धुव्वा उडविला. विरोधी पॅनेलने 16 जागा मिळवत सुतगिरणीत 10 वर्षांनी सत्तांतर घडवून आणले. सत्तारुढ पॅनेलला बिनविरोध झालेली एकमेव जागा मिळाली. निकालानंतर सत्तारुढ पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि आतषबाजी करीत जल्लोष केला. दोन्ही बाजूने मोठी प्रतिष्ठा निर्माण केल्यांने या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते.

सुतगिरणीच्या 17 जागांसाठी पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाली होती. ही निवडणुक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळीनी प्रयत्न केले. मात्र समझोता होऊ शकला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत सत्तारुढ पॅनेलचे गंगाधर तोडकर हे इतर मागासवर्ग गटातून बिनविरोध निवडुन आले होते. तर उर्वरीत 16 जागांसाठी 2 अपक्षांसह 34 उमेदवार निवडणुक रिंगणात होते. प्रचारादरम्यान दोन्ही पॅनेलकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्यामुळे ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणूकीत 2 हजार 436 पैकी 2 हजार 86 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावल्याने 85.63 टक्के मतदान झाले होते. चुरशीने मतदान झाल्यामुळे सत्तारुढ गटाचा धक्का बसणार याचा अंदाज आला होता.

दरम्यान, आज सकाळी निवडणुक निर्णय अधिकारी चंद्रकांत टिकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदराव हायस्कुल येथे प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीपासूनच विरोधी चौंडेश्‍वरी पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते. ही आघाडी शेवटपर्यंत वाढतच राहिली. मतमोजणीअंती एकुण 249 मते बाद ठरली. त्यामुळे सत्तारुढ गटाने त्या बाद मतांची फेर तपासणीची मागणी केली. त्याचा निकालावर कांहीही फरक पडला नाही. अखेर सत्तारुढ पॅनेलचा धुव्वा उडवत चौंडेश्‍वरी पॅनेलने सुतगिरणीत तब्बल १० वर्षानंतर सत्तांतर घडवून आणले. निकालानंतर चौंडेश्‍वरी पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, आतषबाजी करत जल्लोष केला आणि मुख्य मार्गावरून सवाद्य मिरवणुक काढली.

चौंडेश्‍वरी पॅनेलचे विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते अशी- विणकर गट- संजय कांबळे (1108), राजेंद्र बिद्रे (1020), गोविंद ढवळे (1054), गजानन होगाडे (1002), कुमार कबाडे (1005), शिरीष कांबळे (1007), गजानन खारगे (1024), विजय मुसळे (1016), मनोहर मुसळे (1025), विलास पाडळे (1007), अरुण साखरे (1013), महेश सातपुते (957), अनुसुचित गट- विलास खिलारे (1086), महिला गट - सुवर्णा सातपुते (1073), ज्योती वरुटे (1057), भटका विमुक्त जाती गट - श्रीकांत हजारे (1068).

सत्तारुढ पॅनेलला अतिआत्मविश्वास नडला

सत्तारुढ पॅनेलला अति आत्मविश्वान नडल्यांचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट केले. दहा वर्षाच्या कामाचा दाखला देण्यातच त्यांनी धन्यता मानली. तर विरोधी पॅनेलने सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतली. सोशल मिडियाचा खूबीने वापर केला. तर सत्तारुढ पॅनेलमध्ये मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत सामसुम असेच वातावरण जाणवत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT