Christmas special prayers churches in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना; कॅरोल सिंगिंग, फटाके यांना फाटा 

नंदिनी नरेवाडी-पाटोळे

कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आज ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या उत्साहात नाताळ सण साजरा केला. कोरोना महामारीचे संकट असताना सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर आणि मास्कचा वापर करत आज विविध चर्चमधून उपासना करण्यात आल्या. "हे प्रभू, कोरोना महामारीच्या या संकटातून जगाची सुटका कर, सर्वांना आरोग्य दे,' अशी प्रार्थना आज चर्चमधून ख्रिस्ती बांधवांनी केली. 

न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्च, क्राईस्ट चर्च-नागाळा पार्क, ब्रह्मपुरी येथील पवित्र उपासना मंदिर, विक्रमनगर ख्रिस्ती समाज, सेव्हन्थ डे चर्च, होलिक्रॉस चर्च आदींसह शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक चर्चमध्ये नाताळ सण साजरा झाला. न्यू शाहूपुरी येथे वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सहा सत्रांमध्ये प्रार्थना घेण्यात आल्या. कोरोना महामारीमुळे एकत्रित गर्दी होणार नाही याची काळजी घेत सहा स्वतंत्र सत्रांत प्रार्थना करण्यात आल्या. आचार्य डी. बी. समुद्रे, आचार्य जे. ए. हिरवे, आचार्य सिनोय, आचार्य गायकवाड आदींनी प्रार्थना सभांमध्ये पुढाकार घेतला. संदेश आचार्य समुद्रे, आचार्य हिरवे यांनी दिला. 

वायल्डर मेमोरियल चर्चचे आनंद म्हाळुंगेकर, उदय विजापूरकर, संजय थोरात, विनय चोपडे, अतुल रुकडीकर, संदीप थोरात, सचिन समुद्रे, विलास अष्टेकर यांनी स्वागत केले. आमदार चंद्रकांत जाधव, नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. शहरातील सर्वच चर्चमधून अशाप्रकारे उपासना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कॅरोल सिंगिंग आणि फटाके यांना मात्र यंदाच्या वर्षी फाटा देण्यात आला. घरोघरी केक, डोनट यांसह मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिसमसप्रमाणेच न्यू इयर स्वागताची ही भक्ती अशाच प्रकारे केली जाणार आहे. 

हेही वाचा- Kolhapur Traffic Update: प्रेक्षणीय स्थळांवर वाहनांची मोठी गर्दी -
 
कोरोनामुक्तीसाठी विशेष प्रार्थना 
नाताळ सणाच्या दिवशी सर्व चर्चमधून आरोग्यासाठी विशेष प्रार्थना झाल्या. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या अनेक संकटांपासून मानवाची लवकरच मुक्तता व्हावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. सर्व प्रकारच्या संकटांतून देशबांधवांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांसह विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनाही शक्ती मिळावी, यासाठीही प्रार्थना झाल्या. 

 संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानमध्ये ड्रोन हल्ल्यात मृत्यू, शरीराचे तुकडे; DNA टेस्ट करून पार्थिव कुटुंबाकडे द्या; मुंबई हायकोर्टाचे DDGPला आदेश

दीपिकाने धर्म बदलून केलेलं दुसरं लग्न; आता मुलाला नमाज शिकवत आहे अभिनेत्री, भावूक होत म्हणते....

Latest Marathi News Live Update: लातूरमध्ये मद्यधुंद दुचाकीस्वाराने लहान मुलाला उडवले; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Central Railway: मध्य रेल्वेचा दंडवसुलीत विक्रम, विशेष मोहिमेत २४ टीसी ‘करोडपती’

भारतीयांनो लगेच इराण सोडा! युद्धविरामानंतर तेहरानमधील दुतावासाचा इशारा, हेल्पलाइन नंबर जारी

SCROLL FOR NEXT