The City Traffic Bureau has launched a campaign to crack down on noise pollution by shouting loud horns in kolhapur 
कोल्हापूर

'कर्कश हॉर्न' वाजवला तर ही होणार शिक्षा...

राजेश मोरे

कोल्हापूर - कर्कश व्हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आणि रस्त्यावरील इतर वाहन चालकांना अस्वस्थ करणाऱ्या प्रवृत्तीला आता लगाम बसणार आहे. यासाठी शहर वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 

शहरातील वाहतुकीच्या नियोजनासाठी शहर वाहतूक पोलिसांनी वेगवेगळ्या उपययोजना करण्यास सुरवात केली. सुरवातीला वाहतुकीचे नियमाबाबत प्रबोधनाची मोहीम राबविली. त्यानंतर नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. सिग्नल तोडणारे, मोबाईलवर संभाषण करणारे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणारे आणि मद्यपी वाहन चालकांवर कारवाई सुरू झाली. वाहतुकीस शिस्त लागण्यास त्याचा उपयोग झाला. दरम्यान 'कर्कश व्हॉर्न'द्वारे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहन चालक डोके वर काढू लागले. याबाबतच्या तक्रारीही वाढू लागल्या. तत्कालिन पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी कर्कश व्हॉर्न वाजविणाऱ्या चालकांवर कडक कारवाईची मोहीम हाती घेतली होती. 
जागेवरच वाहनाला लावलेले कर्कश व्हॉर्न काढून टाकयाचे आणि संबधितावर दंडात्मक कारवाई करण्याचा त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. 

इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वाहनाला कर्कश व्हॉर्न बसवायचा. कारण नसताना शाळा, महाविद्यालय परिसरात घिरट्या घालायच्या. वारंवार व्हॉर्न वाजवून इतर वाहन चालकांचे लक्ष चलबिचल करणाऱ्या प्रवृत्तीवर वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. कर्कश व्हॉर्नच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण तर होतेच आणि इतरांचा वाहन चालकांचे लक्ष विचलीत होऊन त्यांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होतात. 

कायद्यानुसार ध्वनीमर्यादा अशी : 

परिसर     सकाळी (डेसीबल)  रात्री (डेसीबल) 

  • औद्योगिक         75            70
  • व्यापारी              65            55
  • रहिवासी             55            45 
  • सायलेन्स झोन    50            40
     

कर्कश व्हॉर्न चालकांवरील कारवाई अशी 

           वर्ष          कारवाई 

  • 2018  -   327 
  • 2019  -   206 

 कर्कश व्हॉर्न'द्वारे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर चालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शाळा महाविद्यालयात परीक्षेच्या ठिकाणी आणि रुग्णालयांसह शांतता क्षेत्रात ही मोहीम व्यापक केली आहे. 
- वसंत बाबर, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJP-NCP Clash: भाजप नेते गणेश बिडकर यांचे सुनेत्रा पवारांना पत्र; अमोल बालवडकरांवर ‘अहंकारी, हेकेखोर’ आरोप, विकास निधी रोखल्याचा वाद पेटला

Pimpalvandi Protest: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जनसागर उसळला; नराधमाला २० दिवसांत फाशीची जोरदार मागणी

Mahagaon Rural Hospital: ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Pune Civic Politics: बालवडकरांनंतर टिंगरेंवरही भाजपचा रोष; पत्रप्रकरणातून राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला पुण्यात नवे चिघळले रूप

SCROLL FOR NEXT