Kolhapur News Esakal
कोल्हापूर

Sangli ED action: राजाराम बापू बँकेकडून स्पष्टीकरण, कोणताही गैरव्यवहार नाही, ईडी चौकशी ही फक्त..

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीने छापेमारी सुरू केली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

सांगली शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या सुरेश आणि दिनेश पारेख बंधू, अरविंद आणि ऋषिकेश लढ्ढा या चार बड्या व्यापाऱ्यांसह पिंटू बियाणी या व्यापाऱ्यावर काल ईडीच्या पथकांनी छापे टाकून तपासणी केली आहे. आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ११ वाहनांमधून ६० अधिकारी या कारवाईसाठी सांगलीत दाखल झाले होते. (Latest Marathi News)

तर या छापेमारी नंतर या व्यापऱ्यांचे बँक खाते असणाऱ्या राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातही जाऊन ईडीच्या एका पथकाने या व्यापाऱ्यांच्या खात्याबाबाबत चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. तर या छापेमारी संबधी काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव समोर आले होते त्याचबरोबर या बँकेवर छापेमारी झाली असल्याचा त्यात उल्लेख होता. यासंबधीची संपूर्ण माहिती आणि स्पष्टीकरण समोर आले आहे. (Latest Marathi News)

तर या बँकवर ही छापेमारी नसून ज्या व्यापऱ्यांच्या घरी छापेमारी झाली त्यांच्या बँक खात्याची माहिती घेण्यासाठी अधिकारी बँकेत आले होते. यामध्ये या छापेमारीशी बँकेचा आणि जयंत पाटील यांचा काहीच संबंध नसल्याचे सांगली बँकेकडून स्पष्टीकरण आले आहे. तर बँकेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही ही चौकशी व्यापऱ्यांच्या बँक खात्यांची होती, अशी माहीती राजाराम बापू सहकारी बँकेचे एम डी प्रदीप बाबर यांनी दिली आहे.(Latest Marathi News)

राजाराम बापू सहकारी बँकेचे एम डी प्रदीप बाबर यांनी दिलेले स्पष्टीकरण

ईडीने काही व्यापाऱ्यावर छापेमारी केली त्यांच्या बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी अधिकारी याठिकाणी आले होते. बँक नियमानुसार काम करत आहे. गेली ४२ वर्ष बँकेने जनतेचा विश्वास मिळवला आहे. याठिकाणी कोणतेही गैरव्यवहार होत नाहीत.अधिकाऱ्यांनी व्यापऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती घेतली. तर चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या संबधित माध्यमांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT