Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur : अंडाबुर्जीची गाडी लावण्यावरून दोन गटांत सशस्त्र हाणामारी; 7 जण जखमी, हाॅस्पिटलमध्येही राडा

व्हीनस कॉर्नर (Venus Corner) परिसरात अंडाबुर्जीची गाडी लावण्यावरून दोन गटांत रात्री वाद झाला.

सकाळ डिजिटल टीम

जखमींच्या मान, पाय, पोटावर धारदार शस्त्रांचे वार आहेत. त्याने मोठा रक्तस्रावही झाला होता. प्रथमोपचारानंतर काही जखमींना खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

कोल्हापूर : व्हीनस कॉर्नर (Venus Corner) परिसरात अंडाबुर्जीची गाडी लावण्यावरून दोन गटांत रात्री वाद झाला. त्यातून जोरदार हाणामारी झाली. त्यात धारदार शस्त्रांनी वार करण्यात आल्याने सात जण जखमी झाले. दोन अंडाबुर्जी गाड्या व एक दुचाकीही उलटवली होती.

जखमींना ‘सीपीआर’मध्ये नेल्यावर दोन्ही गटांचे समर्थक सीपीआर आवारात जमा झाले. तेथेही दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. अपघात विभागात गोंधळ घालत काचा फोडल्या. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यामुळे तेथेही तणाव निर्माण झाला. हल्ल्यात शिवाजी मोरे, वैभव मोरे, आकाश वरणे, इकबाल शेख आदींसह सात जण जखमी झाले. व्हीनस कॉर्नर परिसरात तणाव होता.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः व्हीनस कॉर्नर परिसरात एका हॉटेलसमोर दररोज अंडाबुर्जीच्या गाड्या लावल्या जातात. यातून अनेकदा हॉटेल मालक व बुर्जीचे गाडीचालक यांच्यात वाद झाले होते. आज रात्रीही अंडाबुर्जीची गाडी सुरू झाली. त्यानंतर ग्राहकांची गर्दी होत होती. गाड्या रस्त्यावर पार्किंग होत होत्या. गाडीचालक व हॉटेल मालक यांच्यात वाद सुरू झाला. या वादातून हाणामारी सुरू झाली. येथे गर्दी जमली.

यात हॉंटेल मालक आणि गाडीवाल्यांच्या परिचित व्यक्ती तेथे आल्या. दोन्ही गट आमने-सामने भिडले. यात एकमेकांवर हल्ले झाले. त्यात सात जण जखमी झाले. कोणीतरी १०८ ची रुग्णवाहिका बोलावली. अवघ्या काहीच मिनिटांत रुग्णवाहिकेतून जखमींना ‘सीपीआर’मध्ये आणले गेले. त्या पाठोपाठ समर्थकही ‘सीपीआर’च्या थेट अपघात विभागात घुसले.

अपघात विभागातील डॉ. व्यंकटेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींवर उपचार सुरू केले. याच वेळी काही समर्थक आरडाओरड करीत अपघात विभागात दंगा करू लागले. एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन हल्ल्याचाही प्रयत्न झाला. त्यापैकी काही जणांनी गोंधळ घालत अपघात विभागातील काच फोडली. या प्रकारामुळे तेथील डॉक्टर आणि कर्मचारी भयभीत झाले. डॉ. पवार यांनी सहकाऱ्यांना धीर देत जखमींवर तातडीने उपचार केले.

जखमींच्या मान, पाय, पोटावर धारदार शस्त्रांचे वार आहेत. त्याने मोठा रक्तस्रावही झाला होता. प्रथमोपचारानंतर काही जखमींना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या सर्व प्रकाराची सीपीआर पोलिस चौकीत नोंद झाली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरा सुरू झाले होते. सीपीआर आवारात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.

बंदूकधारी पथकाला जुमानले नाही

‘सीपीआर’मध्ये महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक बंदूकधारी पथक आहे. मात्र, जमाव सीपीआर आवार आणि तेथून अपघात विभागात घुसला. त्या वेळी या जमावाला सुरक्षारक्षक रोखू शकले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT