कोल्हापूर

दोन सत्रात दिवसाआड भरणार वर्ग 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : दोन शिफ्टमध्ये आणि दिवसाआड एक वर्ग अशा पद्धतीने 15 जूननंतर शाळा सुरू राहण्याची शक्‍यता आहे. विशेष करून मराठी माध्यमातील शाळांसमोर सध्या हाच पर्याय आहे.

एका बाकावर एक विद्यार्थी बसवावा लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळेच कोणीही खासगी क्‍लासेसच्या वेळा निश्‍चित करू नका, शाळांच्या वेळा बदलण्याची शक्‍यता आहे, असे निरोप शाळांच्या शिक्षकांकडून दिले जात आहेत. 

कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी "फिजिकल डिस्टन्स' पाळणे आवश्‍यक ठरणार आहे. त्यामुळे दोन सत्रात शाळा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 15 जूनला शाळा सुरू होणार असल्याचे संकेत खुद्द शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुलाखतीत दिले आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शाळांतील मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे नियोजन सुरू केले आहे. याचे निर्णय सध्या प्राथमिक टप्प्यात आहेत. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शाळांच्या वेळाबाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्‍यता असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येते. 

अनेक शाळांत प्रत्येक वर्गाची अ,ब,क,ड, अशा तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीत किमान 54 विद्यार्थी असतात. या सर्वांना एका बाकावर एक बसविणे नियमित वेळापत्रकात शक्‍य नाही. तसेच इमारती आणि वर्गही अपुरे पडणार आहेत. त्याला पर्याय म्हणून दोन सत्रात शाळांचे नियोजन करण्याचे प्रयत्न शाळा प्रशासनाच्या पातळीवर सुरू झाले आहेत. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही खासगी क्‍लासेसमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी शाळांना प्राधान्य द्यावे, शाळांच्या वेळांचे नियोजन सुरू झाले असून ते बदलण्याची शक्‍यता वाढली आहे. त्यामुळे पालकांनी शाळांच्या वेळांना प्राधान्य द्यावे, खासगी क्‍लासेसच्या वेळा निश्‍चित करू नये, असे एसएमएस व्हाटस्‌ ऍपव्दारे संदेश दिले आहेत. 

असे वर्ग भरण्याची शक्‍यता 

*पाचवी, सहावी, सातवी ः आठवड्यातील पहिले तीन दिवस 
*आठवी,नववी, दहावी ः आठवड्यातील पुढील तीन दिवस 
* अशाच पद्धतीने प्राथमिक शाळांचे नियोजन 
* विद्यार्थी संख्या जादा असल्यास सकाळी-दुपार अशा दोन सत्रात नियोजन 
*एका बाकावर एकच विद्यार्थी बसणार 
* स्वच्छता आणि इतर सर्व नियम विद्यार्थ्यांना लागू 
* शाळांचे तासही कमी होण्याची शक्‍यता आहे. 

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या मुलाखतीत 15 जूनपासून शाळा सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत. प्रत्येक बाकावर एकच विद्यार्थी असणार आहे. दिवसाआड अशा पद्धतीने तुकड्यांतील विद्यार्थ्यांना बोलविले जाईल, किंवा दोन सत्रात आणि आठवड्याचे पहिले आणि नंतरचे तीन दिवस असे त्याचे नियोजन असेल. त्यामुळेच आम्ही पालकांना, विद्यार्थ्यांना व्हॉटस्‌ ऍपद्वारे शाळांच्या वेळा बदलण्याची शक्‍यता असल्याचे एसएमएस दिले आहेत. 
प्राचार्य भुपाली शिंदे,एमएलजी आणि ज्युनिअर कॉलेज 


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT