cleaning workers say give them a chance to work for free in islampur
cleaning workers say give them a chance to work for free in islampur 
कोल्हापूर

ग्रेटच : सेवानिवृत्ती मिळाली, तरी ही तो म्हणतोय 'विनामूल्य काम करण्याची संधी द्या'...

धर्मवीर पाटील

इस्लामपूर (सांगली) - एखाद्या यंत्रणेत अनेक वर्षे काम करून सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा त्या कामाकडे जायची इच्छा खूप कमी लोकांमध्ये असते, दुप्पट पगार दिला तरी नको इतका तिरस्कार निर्माण झालेला असतो! काहीजण आपल्या सेवानिवृत्त काळात नवे नियोजन करून त्यात रमतात. पण हे झाले मोठ्या पदावरच्या लोकांचे! इस्लामपुरात एक सफाई कर्मचारी सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात पालिकेकडे असणारे अपुरे मनुष्यबळ विचारात घेऊन स्वतःहून पालिकेत आले आणि 'मला काम करण्याची संधी द्या' असा मुख्याधिकाऱ्यांकडे आग्रह धरला. विशेष म्हणजे त्यांनी 'आर्थिक फायदा' मिळविण्याच्या हेतूने हे केले असे नाही तर त्यांनी अर्जात स्पष्ट 'विनामूल्य काम करण्याची संधी मिळावी' असा उल्लेख केला आहे. आजच्या काळातील हे दुर्मिळ उदाहरण आहे. 

आज संपुर्ण जग कोरोनाशी सामना करीत आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा, पदाधिकारी पुर्णवेळ कार्यरत आहेत. इस्लामपूर शहरात तर कहर झाला असून एकाच कुटुंबातील व संबंधित अशा सुमारे २५ जणांना कोरोनाची बाधा झाली.आज २४ तास आपत्कालीन सेवा देण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज आहे. या परिस्थितीतही काही कर्मचारी कोरोना विषाणूच्या संसर्गाला घाबरून काही न काही सबबी सांगुन कामावर हजर राहणे टाळत आहेत, पण इस्लामपूरचे सुरेश सुबय्या मद्रासी मात्र सेवानिवृत्त असूनही त्याला अपवाद ठरले आहेत. सफाई कामगार म्हणून ते महिनाभरापूर्वीच निवृत्त झाले आहेत आणि आता त्यांनी पुन्हा कामावर येण्याची संधी मागून सेवेत दाखलही झाले आहेत. केवळ पगारासाठी पाट्या टाकणाऱ्या लोकांनी या कर्तव्यतत्पर व्यक्तीचा आदर्श घेण्याची गरज आहे.


"कोरोना विषाणू संसर्गाची भीती सगळीकडे पसरली असताना कामावर येणे टाळणारे कर्मचारी आणि मद्रासी यांच्यात खूप फरक आहे. काम टाळणारे कर्मचारी स्वतःची आणि शहराचीही फसवणूक करीत आहेत. सुरेश मद्रासी यांच्या स्वतःहुन शहराला पुर्ण वेळ विनामुल्य सफाई सेवा देण्याच्या भावनेचा आदर्श इतरांनी घ्यावा."
प्रज्ञा पवार-पोतदार (मुख्याधिकारी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT