Clerk arrested for taking bribe of Rs 1 lakh 20 thousand in kolhapur 
कोल्हापूर

लाचेची रक्कम घेऊन गेला स्वच्छतागृहात; बाहेर येताच अडकला जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार नियमानुकूल करण्यासाठी 1 लाख 20 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी कागल प्रांताधिकारी कार्यालयातील लिपीक सागर आनंदराव शिगावकर (वय 36, रा.873, सी वॉर्ड, उमा टॉकीज जवळ, रविवार पेठ) याला आज रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून शिगावकरला लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेतले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली. या सहामहिन्यातील ही 15 वी कारवाई असून आठवड्यातील दुसरी कारवाई आहे. 

याबाबत लाचलुचपत विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार दांम्पत्याने कागल तालुक्‍यातील हमीदवाडा येथील साडे नऊ गुंठे जमीन चौघांना विकली. यातील 9 गुंठे जमीन खरेदी करणाऱ्यांची नावे सात बारा उताऱ्याला लागली. मात्र उर्वरीत अर्धा गुंठा जमिनी बाबतची नोंद झाली नव्हती. ही नोंद करण्यासाठी त्या दांम्पत्याने कागल तलाठी कार्यालयाशी संपर्क केला. त्यांनी कागल, राधानगरी प्रांताधिकारी कार्यालयात मुल्यांकनाच्या 25 टक्के दंड भरून हा व्यवहार नियमानुकूल करून घेण्यास सांगितले. त्या प्रमाणे या दांम्पत्याने प्रांताधिकारी कार्यालयातील लिपीक सागर शिगावकर यांच्याशी संपर्क केला. यावेळी शिगावकर याने मला 1 लाख 20 हजार रुपये द्या तरच काम होईल. अन्यथा कादगपत्रे अपुरी आहेत, असा शेरा मारून अर्ज निकाली काढेन असे सांगितले. त्यानंतर या दांम्पत्याने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची खात्री केल्यानंतर अधिकाऱ्यांनी दोन दिवसापासून सापळा रचला. 

आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमापास हे दांम्पत्य प्रांताधिकारी कार्यालयात आले. सागर शिगावकर याने त्यांच्या कडून 25 टक्के दंडाची रक्कम घेऊन ती जमा केली. त्यानंतर लाचेच्या 1 लाख 20 हजार रुपयांच्या रक्कमेची मागणी केली. त्यांनी रक्कम दिल्यावर शिगावकर याने ही रक्कम घेतली व तो स्वच्छतागृहात गेला. आत जावून त्याने दरवाजा बंद करून घेतला. पैसे मोजून तो रक्कम घेऊन बाहेर येताच तेथे थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रक्कमेसह ताब्यात घेतले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे शिगावकर भांबावून गेला. त्याला अटक करून कोल्हापुरातील लाचलुचपतच्या कार्यालयात आणण्यात आले. 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत, निरीक्षक जितेंद्र पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुचडे, पोलिस कॉन्स्टेबल मयुर देसाई, रुपेश माने, संदीप पडवळ यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT