Keshavrao Bhosale Theatre Fire esakal
कोल्हापूर

'केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सात दिवसात सादर करा'; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

Keshavrao Bhosale Theatre Fire : कलापूरची रंगभूमी आणि संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे एक अतूट समीकरण आहे.

सकाळ डिजिटल टीम

क्षीरसागर म्हणाले, घडलेली घटना दुर्दैवी असून, कोल्हापूरवासीयांच्या मनावर आघात करणारी आहे. या राखेतून नाट्यगृह पुन्हा उभारी घेईल.

कोल्हापूर : कलापूरची रंगभूमी आणि संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे एक अतूट समीकरण आहे. रंगभूमीच्या एकूणच प्रवासाचं हे नाट्यगृह प्रमुख साक्षीदार असून, इथला प्रत्येक रंगकर्मी जगाच्या रंगभूमीवर गाजला. कोल्हापूरची अस्मिता असलेले हे नाट्यगृह आगीत बेचिराख (Keshavrao Bhosale Theatre Fire) होताना मनाला अत्यंत वेदना झाल्या. घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देण्यात आली.

आज सकाळी पुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून, नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव ७ दिवसांत सादर करण्याचे आदेश महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation) प्रशासनास दिली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी दिली.

नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव

आज सकाळी नाट्यगृहाच्या परिसराची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांना नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सात दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी झालेल्या नुकसानीची माहिती घेत क्षीरसागर यांनी पुनर्बांधणीसाठी आवश्यक आराखडा तात्काळ तयार करावा. नाट्यगृहाचा ऐतिहासिकपणा कायम राहिल अशा पद्धतीने आराखडा तयार करावा. यामध्ये कलाकारांना व या क्षेत्राशी संबंधित अनुभवी व्यक्तींची मते विचारात घेवून प्रस्ताव सादर करण्याचेही आदेश दिले आहेत.

घडलेली घटना दुर्दैवी

क्षीरसागर म्हणाले, घडलेली घटना दुर्दैवी असून, कोल्हापूरवासीयांच्या मनावर आघात करणारी आहे. या राखेतून नाट्यगृह पुन्हा उभारी घेईल. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह राज्य सरकार सक्षम आहे. काल तात्काळ १० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. यासह आवश्यक तो सर्व निधी देण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासित केले आहे. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. यावेळी आयुक्त के. मंजूलक्ष्मी, उपायुक्त राहुल रोकडे, शहरअभियंता नेत्रदीप सरनोबत, अग्निशमन दलाचे प्रमुख मनिष रणभिसे आदी उपस्थित होते.

Sangeetsurya Keshavrao Bhosale Theatre Fire

क्षीरसागरांचा कलाकारांना दिलासा; 5 लाखांची मदत केली जाहीर

नाट्यगृहाच्या भेटीदरम्यान परिसरात अनेक कलाकारांशी राजेश क्षीरसागर यांनी संवाद साधला. यावेळी कलाकारांनी भावनिक होत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या कलाकारांची क्षीरसागर यांनी आपुलकीने चौकशी करून दिलासा दिला. नाट्यगृहात नाटकाच्या पुढील प्रयोगासाठी ठेवलेले लाखो रुपयांचे साहित्य मातीमोल झाल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्थ झाल्याची माहिती उपस्थित कलाकारांनी क्षीरसागर यांना दिली. यावर तत्परतेने राजेश क्षीरसागर यांनी या नुकसानीसाठी ५ लाखांची वैयक्तिक मदत जाहीर केली. यावेळी अभिनेते अनंत काळे, अभिनेत्री छाया सांगावकर, प्रसाद जमदग्नी, गोरक्षनाथ कालेकर, संतोष शिंदे, रमेश सुतार, सागर बगाडे, सुनील घोरपडे, राज पाटील, मुकुंद सुतार यांच्यासह शिवसेना उपशहरप्रमुख सचिन पाटील, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police officer kicking protester VIDEO: …अन् पोलिस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलने 'त्या' आंदोलकाच्या कंबरेत घातली लाथ ; व्हिडिओ व्हायरल !

Local Megablock: प्रवाशांनी खबरदारी घ्या! मुंबई लोकलच्या मार्गावर रात्र आणि दिवसाचा मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? जाणून घ्या...

तेजश्रीसोबत नवऱ्याला रोमान्स करताना पाहून काय म्हणाली सुबोधची पत्नी? दिली भन्नाट प्रतिक्रिया, म्हणते- अगं तू...

GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT