uddhav thackeray devendra fadanvis 
कोल्हापूर

आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत 'खुलेआम' काय झाला संवाद?

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरमध्ये पुरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी आजी-माजी मुख्यमंत्री शाहुपुरीत आमनेसामने आल्याचं दृश्य पाहायला मिळालं होतं.

कोल्हापूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरमध्ये पुरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी आजी-माजी मुख्यमंत्री शाहुपुरीत आमनेसामने आल्याचं दृश्य पाहायला मिळालं होतं. ठाकरे-फडणवीस यांच्यामध्ये काही मिनिटे चर्चाही झाली होती. त्यांच्या या अनपेक्षित भेटीमुऴे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, शिवाय दोघांमध्ये काय बोलणं झालं याबाबत उत्सुकता लागली होती. दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा केला आहे. (cm uddhav thackeray meet bjp devendra fadanvis in shahupur politics)

देवेंद्र फडणवीस शाहुपुरीत असल्याचं कळालं, त्यामुळे त्यांना फोन केला आणि थांबा म्हटलं. आम्हाला लोकांच्या जीवाशी खेळ करायचा नाही. त्यांच्याकडून काही चांगल्या सूचना आल्यास स्वागत आहे. आम्ही दरवाजा आड बोललो नाही, खुलेआम बोललो. कायमस्वरुपी मार्ग काढायचा आहे. विरोधकांच्या सुचनेचेही स्वागत आहे. सर्वांचे एकमत होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष एकत्र आल्यानंतर जे होईल त्यात कोणी आड येणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचेही चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर आमचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. नदीपात्रातली अतीक्रमणे, बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. या पुराचं भीषण वास्तव जवळून पाहिल्यानंतर त्यासंदर्भातील कामाला, आराखड्याला गती दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT