cm writes chief justice of bombay hc demand for circuit bench in kolhapur sakal
कोल्हापूर

कोल्हापुरातच व्हावे सर्किट बेंच; मुख्य न्यायमूर्तींना मुख्यमंत्र्यांची विनंती

कृती समिती आज भेटणार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरातच व्हावे, या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, या संदर्भात खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ मुख्य न्यायमूर्तींना उद्या (ता.१०) संध्याकाळी साडेपाचला वाजता भेटणार आहे. त्यानिमित्त होणाऱ्या बैठकीत याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू व्हावे, ही सहा जिल्ह्यांतील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. याबाबत यापूर्वीही उच्च न्यायालयाशी पत्रव्यवहार झाला आहे. व्यापक जनहित लक्षात घेऊन कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेचा विचार करावा. खंडपीठ होईपर्यंत येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेच सुरू करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायमूर्तींना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

या संदर्भात कोल्हापूर बार असोसिएशनने या संदर्भात सांगितले, की मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे, की उच्च न्यायायलयाचे खंडपीठ १९८४ मध्ये औरंगाबाद येथे सुरू करण्यात आले. त्यानंतर राज्याच्या दक्षिणेकडील भागात कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचा समावेश करून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करण्याचा मागणीचा सर्वसमावेशक जनतेच्या हितासाठी अनुकूल विचार करणे आवश्यक आहे. नियमित खंडपीठ स्थापन होईपर्यंत लवकरात लवकर सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन केले तर मी आभारी राहीन. यामुळे याचिकाकर्त्यांच्या दारापाशी न्याय मिळवून देण्याचे आणि दीर्घकालीन मागणीची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट साध्य करणे सुलभ होईल.

दरम्यान, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी उद्या (ता.१०) खंडपीठ कृती समितीला चर्चेसाठी मुंबईत बोलावले आहे. यासाठी समितीचे निमंत्रक व जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे, सिंधुदुर्गचे ॲड. संग्राम देसाई, निवृत्त न्यायाधीश तानाजी नलवडे, ज्येष्ठ विधिज्ञ संतोष शहा, ॲड. श्रीकांत जाधव (सांगली), ॲड. युवराज नरवणकर, सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख, माजी अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे, ॲड. प्रशांत चिटणीस आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा बार असोसिएशनकडून देण्यात आली.

राजकीय श्रेय...

मुख्यमंत्र्यांच्या पत्रामुळे खंडपीठ लढ्याला बळ मिळाले असून लवकरात लवकर कोल्हापुरात खंडपीठाचा पहिला टप्पा म्हणून सर्किट बेंच स्थापन होईल, अशी मला खात्री वाटते असे ट्वीट पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. दरम्यान खंडपीठ मागणीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बळ दिले आहे. मुख्य न्यायमूर्तींना पाठविलेले पत्र आणि शासनाच्या सकारात्मक धोरणाबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एका पत्रकाव्दारे आभार व्यक्त केले आहेत.

दहा वर्षांत पाच पत्रे

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, या संदर्भात तत्कालिन मुख्यमंत्र्यांकडून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पाच वेळा पत्रे पाठविण्यात आली आहेत. १२ नोव्हेंबर २०१२, ७ सप्टेंबर २०१३, १७ जुलै २०१५, २८ फेब्रुवारी २०१८ आणि १९ जून २०१९ मध्ये ही पत्रे पाठविण्यात आली होती.

लोकप्रतिनिधी- पदाधिकाऱ्यांची आज बैठक

मुख्य न्यायमूर्तींच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर पुढील दिशा निश्चित करण्यासाठी उद्या (ता.१०) सर्व सहा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईत आयोजित केली आहे. ही बैठक महिला विकास मंडळ कुलाबा (मुंबई) येथे सायंकाळी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT