Cocaine Sale Case esakal
कोल्हापूर

कोल्हापुरातील 'कोकेन'चे कनेक्शन मुंबईमार्गे हैदराबाद, तांबडेला मुंबईतून अटक; शेअर मार्केटमध्ये नशीब आजमावलं, अन्..

Cocaine Sale Case : कोल्हापुरात (Kolhapur) आणल्यानंतर केलेल्या चौकशीत त्याने हे कोकेन हैदराबाद येथून आणल्याची कबुली दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

तांबडेने घेतेलेले कोकेन हैदराबादहून आल्याचे समजते. हैदराबाद येथील त्याच्या पुरवठादाराच्या शोधासाठीही पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

कोल्हापूर : कोकेन विक्रीप्रकरणी (Cocaine Sale Case) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जुना बुधवार पेठेतील नीलेश जाधव याला अटक करून २० लाखांचा माल जप्त केला होता. त्याने हे कोकेन मुंबईतून आणल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांच्या पथकाने शनिवारी (ता. १२) मुंबईत जाऊन विशाल विलास तांबडे (रा. ग्रँट रोड, मुंबई, मूळ रा. रायगड कॉलनी, पाचगाव) याला अटक केली.

त्याला कोल्हापुरात (Kolhapur) आणल्यानंतर केलेल्या चौकशीत त्याने हे कोकेन हैदराबाद येथून आणल्याची कबुली दिली आहे. त्यामुळ कोकेन कनेक्शनचा तपास आता मुंबईमार्गे हैदराबाद असा होणार आहे. मुंबईत शेअर मार्केटचा व्यवसाय करणारा संशयित तांबडे मूळचा कोल्हापूरचाच आहे. त्याची नीलेश जाधव सोबत ओळख होती. जाधव यानेही शेअर मार्केटमध्ये नशीब आजमावले होते; परंतु तो यामध्ये तोट्यात गेल्याने कर्जबाजारी झाला होता. यामुळे त्याने अमली पदार्थांतून पैसे कमावण्यासाठी तांबडेकडून कोकेन घेतल्याचे तपासात पुढे आले.

संशयित तांबडे याचाही शेअर मार्केटमध्ये तीन ते चार कोटींच्या घरात तोटा झाला आहे. तो हॉटेल व्यवसायात नशीब आजमावण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, त्यासाठी त्याच्याकडे पुरेशी रक्कम नव्हती. कोकेनसारख्या अमली पदार्थाची विक्री करून त्याने पैसा पुन्हा उभा करण्यासाठी हा मार्ग अवलंबला. त्यानेही त्याच्या दुसऱ्या एका मित्राकडून हे कोकेन घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

तांबडेने घेतेलेले कोकेन हैदराबादहून आल्याचे समजते. हैदराबाद येथील त्याच्या पुरवठादाराच्या शोधासाठीही पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. त्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जाधव व तांबडे या दोघांनाही न्यायालयाने १४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT