Collector Daulat Desai has put up a No Visitors sign outside his office 
कोल्हापूर

म्हणून... जिल्हाधिकाऱ्यांच्या दालना बाहेर लागला 'हा' फलक...

सुनील पांडुरंग पाटील

कोल्हापूर - जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी त्यांच्या दालनाबाहेर ‘नो व्हिजिटर्स’ असा फलक लावला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी अभ्यागतांना बंदी घातली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच जिल्ह्यात पॉझिटिव्ह येणाऱ्यांची रोजची संख्या काळजी करण्यासारखी आहे. तरीही अनेक जण जिल्हाधिकाऱ्यांनाच भेटण्यासाठी आग्रह धरीत आहेत. कार्यालयात यापूर्वी पुरवठा विभागातील अव्वल कारकून, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा चालक आणि नंतर खुद्द निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच महसूलमध्ये वेगवगेळ्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कार्यालयातील संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट ‘नो व्हिजिटर्स’ असा फलकच त्यांच्या दालनाबाहेर लावला आहे. अनेक कार्यकर्ते निवेदन घेऊन येत आहेत, काही तरी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच भेटण्याचा अग्रह धरीत आहेत. त्यामुळेच नाइलाजास्तव हा फलक लावावा लागला आहे. 

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT