Collector Daulat Desai warning private hospitals if the patient refuses Let's file a crime  
कोल्हापूर

...तर कोल्हापूरातील खासगी रुग्णालयांचे परवाने होणार रद्द....

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील खासगी रूग्णालयांनी त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांवर बेड उपलब्ध नाही, या कारणास्तव उपचार करण्यास नकार दिल्यास अशा रूग्णालयांवर साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.

खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणारा रुग्ण नाकारणे हा गुन्हा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, की जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड आरक्षित करण्यात आले असून 20 टक्के बेडवर नॉन कोव्हिड रुग्णांवर उपचारासाठी आहेत. कोल्हापूर शहरात महापालिका आयुक्तांमार्फत तर जिल्ह्यातच्या ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत बेड आरक्षित करण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात खासगी रुग्णालयात येणारे कोव्हिड, नॉन कोव्हिड रुग्ण  बेड उपलब्ध नाही या कारणास्तव दाखल करुन घेतले जात नाहीत, अशी वस्तूस्थिती आहे.  याबाबत जिल्हाधिकारी यांनी खासगी रुग्णांलयाना इशारा दिला आहे. खासगी रुग्णालयानी त्यांच्याकडे उपचारासाठी येणारा रुग्ण कोव्हिड रुग्ण असो किवा नॉन कोव्हिड असो त्याला  उपचारासाठी दाखल करुन घ्यावे. अशा रुग्णांवर कोव्हिड संदर्भातील योग्य ती काळजी घेऊन त्याच्यावर उपचार सुरु करावेत. दुसऱ्या दिवशी अशा रुग्णास ज्या ठिकाणी बेड उपलब्ध आहे त्या ठिकाणी उपचारासाठी पाठविले जाईल.


खासगी रुग्णालयांकडे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णास बेड उपलब्ध नाही या कारणास्तव नाकारल्यास अशा रुगणालयांवर कडक कारवाई करुण्यात येईल. प्रसंगी अशा रुग्णालयांवर गुन्हेही दाखल करण्यात येतील. महापालिका क्षेत्रात आयुक्त आणि नगरपालिका क्षेत्रात संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्यामार्फत रुग्ण नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येऊन गुन्हे दाखल केले जातील, असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Marathi News Live Updates : बदलापुरात बसची दुचाकीला धडक दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

लालबागच्या राजाच्या चरणांचं कुंकू पत्नीच्या भांगेत भरलं अन्...; संजय दत्तचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT