कोल्हापूर

कोल्हापूर : जिल्हाधिकारी आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

जिल्हाधिकाऱ्यांचा निवेदन घेण्यास नकार , तर निषेधार्थ दालनाबाहेर चिकटवले निवेदन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सीपीआरमधील परिचारिकांच्या बदल्यांबद्दल निवेदन देण्यासाठी गेलेल्या भाजपा पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यामध्ये खडाजंगी झाली. निवेदन देण्यासाठी दालनामध्ये गेलेल्या भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यासाठी उपस्थितांच्या संख्येवरून सुनावले.

यावेळी राजकीय गर्दी चालते तर एखादा अधिकच व्यक्ती का चालत नसल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारले. यावरून शाब्दिक चकमक उडाली. याचवेळी या प्रसंगाचे छायाचित्रण करत असलेल्या वृत्तपत्र छायाचित्रकाराचा कॅमेरा जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दालनाबाहेर येत घोषणाबाजी केली. या गोंधळानंतर जिल्हाधिकारी दालना बाहेर येऊन निवेदन स्वीकारू लागले.

मात्र पुन्हा भाजप कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन न स्वीकारताच पुन्हा दालनांमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी अधिकच संतप्त झाले. त्यांनी हे निवेदन निषेध म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर चिकटवले व त्यांच्या या कृतीचा निषेध नोंदवला. घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे महेश जाधव व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Anjangaon: खेलोबा देवस्थानाची जागा असल्याचे मान्य! शिवरायांच्या पुतळ्याबाबत अखेर तोडगा; राजन पाटलांची मध्यस्थी, एका रात्रीत काय घडलं?

Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

SCROLL FOR NEXT