collects tickets for eight hundred and fifty films man in belgum 
कोल्हापूर

अजबच... 'या' व्यक्‍तीने आतापर्यंत पाहिले तब्बल 850 चित्रपट अन् तिकीटांचा केला संग्रह...

मिलिंद देसाई

बेळगाव - सध्या इंटरनेटच्या जमान्यात चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. मात्र बेळगावातील एका व्यक्‍तीने आतापर्यंत तब्बल 850 चित्रपट पाहिले आहेत. तसेच पाहिलेल्या प्रत्येक चित्रपटाच्या तिकीटाचा संग्रह केला असुन आपला छंद जपण्यासाठी त्यांनी पाहिलेल्या प्रत्येक चित्रपटाच्या अभिनेत्यासह निर्माता आदींचे नावे तिकीटाच्या पाठीमागे लिहुन ठेवली आहेत. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या गाईट चित्रपटापासुनची तिकीटे त्यांच्या संग्रहात असुन चित्रपटांचे दर कशा प्रकारे वाढत गेले हे त्यांच्या संग्रहावरुन दिसुन येते. 

प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा छंद असतो मात्र काही लोकच आपला छंद जपत असतात त्यामुळे काही जणांनी वेगवेगळ्या प्रकारचा संग्रह, केल्याची अनके उदाहरणे पहावयास मिळतात मात्र आतापर्यंत थिएटर जाऊनमध्ये 850 चित्रपट पाहणाऱ्या बसवाण गल्ली शहापूर येथील रविंद्र सुतार यांनी गाईड चित्रपट एक रुपयात पाहिला होता त्यांनतर एक रुपये, दिड रुपये, दोन रुपये ते चित्रपटाचा दर 15 रुपये इतका होता तेंव्हापर्यंतची सर्व तिकीटे त्यांनी संग्रहीत केली आहेत.1965 पासुन दर आठवड्‌याला प्रदर्शित झालेला त्यांनी पाहिलेला आहे. चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित झाला त्यासह अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शकांची माहिती लिहुन ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील जुनी तिकीटे पाहण्यासाठी अनेकजण येत असतात. 

सुतार यांचे मुळ गाव बेळगाव असले तरी ते नोकरीनिमित्त इचलकरंजी येथे अनेक वर्ष होते त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या अधिकतर चित्रपटांची तिकीटे ही इचलकरंजी व कोल्हापूर शहरातील थिएटर्समधील आहेत. तिकीटांचा संग्रह करण्याबरोबरच वर्तमान पत्रात छापुन आलेले व्यंगचित्र मोठ्‌या कागदावर रेखाटण्याची त्यांना सवय असुन त्यांनी आतापर्यंत अनेक व्यंगचित्रे रेखाटली असुन टिव्हीवर जुने चित्रपट अधिक प्रमाणात दाखविले जात नाहीत याची त्यांना खंत आहे. सुतार यांना छंद जोपासण्यात त्यांच्या कुटुंबियांनी नेहमीच सहकार्य केले आहे
 

आई व आजीसोबत इचलकरंजी येथे लहान असताना पहिला चित्रपट पाहीला होता. त्यांनतर चित्रपट पाहण्याची आवड निर्माण झाली तेंव्हापासुन आवडलेला चित्रपट दोन ते तिनवेळाही पाहिला आहे मात्र सध्याच्या चित्रपटात रस नाही त्यामुळे चित्रपट पाहणे बंद केले असुन दहा वर्षांपासुन चित्रपट पाहणे बंद केले आहे. मात्र जुन्या चित्रपटांची तिकीटे सांभाळुन ठेवली आहेत जुन्या चित्रपटातुन एक संदेश मिळायचा सध्या असे चित्रपट येत नाहीत  - रविंद्र सुतार, शहापूर

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT