college campus atmosphere start in college education marathi news 
कोल्हापूर

सेल्फीने लुटला आनंद;  स्टेटसवर  झळकले डीपीसह फोटो

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: कोरोनामुळे घरी बसलेल्या विद्यार्थ्यांनी सुमारे 11 महिन्यानंतर महाविद्यालयात  पाऊल ठेवले. लेक्‍चर्स, मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी व नवे धडे शिकण्यात त्यांचा दिवस सरला. काही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या पन्नास टक्के उपस्थितीची अट असली तरी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसले. दरम्यान, जिल्ह्यातील 121 महाविद्यालये, तर शिवाजी विद्यापीठातील 39 अधिविभाग सुरू झाल्याने कॅंपस विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजला. 


विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजला कॅंपस 

संचारबंदीत महाविद्यालयांचे दरवाजे बंद होते. नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर उर्वरित वर्ग कधी सुरू होणार याची प्रतीक्षा होती. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 15 फेब्रुवारीपासून वर्ग सुरू होणार असल्याची घोषणा केली. शासकीय आदेशाचे पालन करून महाविद्यालयीन प्रशासनाने वर्ग सुरू करावेत, असे आदेश दिले. त्यानुसार आज महाविद्यालये सुरू झाली. काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग केले. सॅनिटायझरचा पुरवठाही केला. 

सेल्फीने लुटला आनंद... 
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सेल्फी घेऊन आनंद लुटला. त्यांनी लगेचच त्यांचे फोटो डीपीसह स्टेटसवर झळकवले. 

महाविद्यालयात कधी पाऊल ठेवते, याची उत्सुकता होती. कोरोनामुळे त्यावर पाणी फिरले. मात्र, आता महाविद्यालयात पहिल्यांदाच पाऊल ठेवले. नव्या मैत्रिणींची ओळख झाली. पहिला दिवस आनंदात गेला. 
-ईशा तांबट, न्यू कॉलेज 
 
आज पहिले लेक्‍चर अटेंड केले. नव्या मित्रांच्या सहवासात महाविद्यालयाच्या परिसरात फेरफटका मारला. पहिल्या दिवसाचा अनुभव खूपच वेगळा होता. 
-चैतन्य यादव, न्यू कॉलेज

संपादन- अर्चना बनगे 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Shivsena News : शिवसेनेला धनुष्यबाण मिळालं तरी कसं? बघा संपुर्ण इतिहास

पत्राच्या घरापासून सुरुवात; आज हक्काच्या घरात गृहप्रवेश, पण सुख पाहायला बहीण नाही, लोकप्रिय इन्फ्लुएन्सरची पोस्ट चर्चेत

Leopard Attack: दूध घालून परतताना उसातून बिबट्याची झेप! दुचाकीस्वार शेतकऱ्याने हल्ला चुकवत वाचवला जीव, बिबट्याच्या हल्ल्याने थरकाप..

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT