Comfortable: In the police station itself, there is a separate system of road security 
कोल्हापूर

दिलासा दायक ः पोलिस ठाण्यातील पोलिस ठाण्यातच, रस्त्यावरील बंदोबस्ताची वेगळी यंत्रणा

राजेश मोरे

कोल्हापूर ः रस्त्यावरील बंदोबस्ताची वेगळी तर ठाण्यातील कामासाठीची स्वतंत्र कुमक, असे नियोजन पोलिस यंत्रणेने केले आहे. अधिकाऱ्यांकडून मोबाईलद्वारे क्वारंटाईन कक्ष, कंटेन्मेंट झोन आदी ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंधासाठी ही खबरदारी यंत्रणेकडून घेण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा संकटात जिल्ह्या प्रशासनाच्या आदेशाची अंमलबाजवणी, आरोग्य विभागाला मदत, अलगीकरण कक्ष, कंटेन्मेंट झोन आदी ठिकाणचा बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण पोलिसांवर आहे. कायदा सुव्यवस्था, वाहतुकीचे नियोजनाची जबाबदारी सांभाळत पोलिस आपले कर्तव्य गेल्या चार महिने अव्याहत सांभाळत आहेत. पण पोलिस दलातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तशी पोलिस यंत्रणेने दक्षता घेण्यास सुरवात केली आहे. 
बाहेरगावाहून आलेल्या व्यक्ती, कोरोना सदृश लक्षणे, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीसाठी स्वतंत्र व्यवस्था आरोग्य विभागाकडून केली आहे. अशी रुग्णालये, अलगीकरण कक्षाबरोबर कोरोनाबाधित रुग्ण ज्याठिकाणी अढळलेले तो कंटेन्मेंट केलेला परिसर येथे पोलिसांचा बंदोबस्त तैनात असतो. अशा ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना संसर्गाचे धोक्‍यांचा सामना करत कर्तव्य बजावावे लागते. 
सध्या कोरोनाचा वाढता धोका विचारात घेऊन पोलिस ठाणे पातळीवर बंदोबस्त व ठाण्याचे दैनंदिन काम, अशी दोन विभागात विभागाणी करण्यात आली आहे. बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना मोबाईलवरून अधिकाऱ्यांकडून सूचना दिल्या जातात. त्यांना पोलिस ठाण्यात येण्याची सक्ती करण्यात आली नाही. कर्तव्य बजावून ते थेट वरिष्ठांच्या परवानगीने त्यांना थेट घरी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. दुसरीकडे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन कर्तव्य पार पाडली जात आहेत. बंदोबस्ताच्या या वेगळेपणाने संसर्गाचे धोके टाळण्यास चांगली मदत होत असल्याने पोलिसांतून समाधान व्यक्त होत आहे. 

मोबाईलद्वारे ड्यूटीचे नियोजन 
मोबाईलद्वारे सूचना 
पोलिस ठाण्यात येण्याची सक्ती नाही 

स्पिकरवरून सूचना 
कंटेन्मेंट झोन, अलगीकरण कक्ष आदी ठिकाणच्या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगबाबत "सेंट्रलाईज्ड पब्लिक अनाउन्मेंट सिस्टीम'द्वारे स्पिकरवरून सूचना अधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहेत. ही सिस्टीम मोबाईलला जोडली असल्याने त्याच्या वापर अधिकारी पोलिस ठाण्यातूनही करू शकतात.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT