Community Tulsi Marriages In More Than Two Hundred Houses At The Same Time In Ichalkaranji Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत एकाच वेळी दोनशेहून अधिक घरांत सामुदायिक तुळशी विवाह

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : दोन-चार ठिकाणी स्पीकर लावायचे. एका मध्यभागी घरालगत भटजींना बसण्याची व्यवस्था. एका ठिकाणी बसून भटजी सांगतील तसे एकाच वेळी दोनशेहून अधिक कुटुंबांच्या घरी विधिवत पूजा आणि मंगलाष्टकांनुसार तुळसी विवाह सोहळा पार पडतो. हे सामुदायिक तुळसी विवाहाचे चित्र इचलकरंजी येथील गांधी कॅम्प गल्लीतील. गांधी कॅम्पने ही सामुदायिक तुळसी विवाहाची परंपरा 30 वर्षे अखंडितपणे जपली आहे. 

तुळशी विवाह म्हणजे भटजींना घरी बोलावून विधिवत पूजा, मंगलाष्टका आणि वधू-वरांच्या लग्नाप्रमाणे उत्साहाचे वातावरण. मात्र तुळशी विवाह हा प्रत्येकाच्या घरी असल्याने भटजींसाठी चढाओढ निर्माण होते. एका गल्लीतील तुलसी विवाहसाठी भटजीला पाच ते सहा तास लागतात. त्यामुळे भटजीच्या प्रतीक्षेत तुळसी विवाहासाठी ताटकळत बसण्याची वेळ कुटुंबावर येई. यावर गांधी कॅम्प गल्लीने नामी शक्कल लढवत सामुदायिक तुळशी विवाह करण्यास सुरुवात केली. ही प्रथा आजही या गल्लीने परंपरेने कायम जपली आहे. 

1990 पासून सामुदायिक तुळशी विवाहाला गांधी कॅम्प गल्लीत सुरुवात झाली. तब्बल तीस वर्षानंतर ही परंपरा अखंडपणे गुण्यागोविंदाने या गल्लीत जपली जाते. सुमारे दोनशेहून अधिक कुटुंबांच्या घरी एकाचवेळी तुळशी विवाह पार पडतो. हे सामुदायिक विवाहाचे चित्र पाहण्याजोगे असते.

भटजी सांगतील त्याप्रमाणे एकाच वेळी विधिवत पूजा केली जाते. मंगलाष्टकांना सुरूवात होताच प्रत्येक कुटुंब आपल्या घरासमोर उत्साहाने विवाहात सहभागी होतात. सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्यामुळे प्रत्येक कुटुंबाला विवाह सोहळा सुलभपणे पार पाडता येतो. गांधी कॅम्प गल्लीची ही अनोखी परंपरा अनेकांना आदर्शवत आहे. 

गांधी कॅम्प पॅटर्न रुजतोय 
शहरात गांधी कॅम्पचा सामुदायिक तुळशी विवाह पॅटर्न अनेक सार्वजनिक मंडळे आपापल्या गल्लीत राबवताना दिसत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ठिकठिकाणी अशाच पद्धतीचे तुळशी विवाह सोहळे पार पडले. तब्बल तीस वर्ष जपणाऱ्या गांधी कॅम्पची ही परंपरा परंपरा शहरात रुजत आहे. 

यावर्षीचे हे तिसावे वर्ष
गल्लीतील प्रत्येक घरातील तुळशी विवाह करताना भटजींची उपलब्द होताना मोठी अडचण निर्माण होत असे. विशिष्ट हेतूने यावर उपाय शोधत 1990 पासून सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्यास प्रारंभ केला. यावर्षीचे हे तिसावे वर्ष आहे. 30 वर्षानंतर ही परंपरा कायम टिकवून ठेवली आहे. 
- रामचंद्र सोनटक्के, जेष्ठ नागरिक, गांधी कॅम्प 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT