Complaint Against The Inspectors Who Torcher The Sarpanch Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

सरपंचांना दम देणाऱ्या निरीक्षकावर विरूध्द तक्रार

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या कारभारावर आज गडहिंग्लज तालुका सरपंच संघटनेने प्रांताधिकारी व पोलिस उपअधीक्षक कार्यालयात तक्रार केली आहे. सरपंच, उपसरपंचांना दम देऊन त्यांच्याशी उद्धट वर्तणूक करणाऱ्या श्री. गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी निवेदनातून केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गावागावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत आहे. अध्यक्ष म्हणून अत्यावश्‍यक सेवेसाठी सरपंचाच्या सहीने पत्र देण्यास सांगितले आहे. परंतु, श्री. गायकवाड यांनी हे पत्र घेऊन आलेल्यांवरच गुन्हे दाखल करताहेत. वाहने जप्त करीत आहेत. बॅंकेच्या कामासाठी महिला सरपंचांना पतीसोबत यावे लागते. अशा महिला सरपंचांना उद्धट बोलून मानहानी करीत आहेत. वाहन सोडण्याची विनंती केली असता दिवसभर पोलिस ठाण्याच्या दारात उभे करतात. 

सरपंच संघटनेच्या व्हॉटस ऍप ग्रुपवर सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यावर तक्रार केल्यास गायकवाड यांनी वैयक्तिक संबंधित सरपंचांना फोन करून अपमान करतात. संघटनेचे अध्यक्ष उदयसिंह चव्हाण, उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे, ज्योत्स्ना पताडे, सरचिटणीस शिवाजी राऊत, खजिनदार संजय कांबळे, सचिव राजेंद्र चव्हाण, सहसचिव सतीश कोळेकर, विकास मोकाशी यांच्यासह अन्य सरपंचांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे. 

मी नोकरी सोडण्यास तयार
लॉकडाउन काळात काही सरपंच, उपसरपंच गावात राजकीय हेतुने वर्तन करीत आहेत. लोकांच्या तक्रारीनंतर त्यांना मी जरूर बोललो आहे; परंतु अर्वाच्च भाषा वापरलेली नाही. काही सरपंचांच्या संबंधित व्यक्तींचे जप्त केलेले वाहन सोडण्यास नकार दिल्याने व पोलिस कारवाईने दुखावलेल्या मंडळींनी ही तक्रार केली आहे. महिला सरपंचांना मी अर्वाच्च शब्दात बोलल्याचा आरोप सिद्ध झाल्यास मी नोकरी सोडण्यास तयार आहे. तसेच जाहीर माफीही मागेन.
- प्रकाश गायकवाड, पोलिस निरीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT