Complete the Bun Burner Sandal Tire Challenge by bikers from kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूरच्या बायकर्सने पूर्ण केले 'हे' चॅलेंज....

सुयोग घाटगे

कोल्हापूर - जगभरातील जाँबाज दुचाकीस्वारांची मातृसंस्था म्हणून ओळख असणाऱ्या आयर्न बट असोसिएशनकडून विविध आव्हाने तयार केली आहेत. असेच एक आव्हान कोल्हापूरच्या दुचाकीस्वारांनी पूर्ण केले आहे. बायकर्स ऑफ  इंडियाच्या ६ दुचाकीस्वारांनी हे आव्हान स्वीकारत २ जणांनी बन बर्नर व चौघांनी सॅंडल सोर पूर्ण केले आहे. 

दुचाकी आणि ते हाताळणारे स्वार अशा प्रत्येकाची अशी एक वेगळी दुनिया असते. अशातच काहींना दुचाकी वापरणे काहींच्या कामाचा भाग अथवा गरजेचे  दळणवळणाचे साधन असते तर काहीजणांना याचा शौक असतो. या शौकातूनच दुचाकीच्या स्पर्धा, कसरती आणि कलाबाजीचा उदय झाला. मात्र, याही पुढे जात स्वतःची दुचाकी चालवण्याची क्षमता सिद्ध करणाऱ्यांसाठी अमेरिकेत १९८४ मध्ये उदयास आलेली आयर्न बट ही दुचाकीस्वारांची असोसिएशन. या असोसिएशनद्वारे या क्षमता सिद्ध करणाऱ्यांसाठी विविध आव्हानांची निर्मिती केली आहे. यातीलच चॅलेंज म्हणजे सॅंडल सोर आणि बन बर्नर होय. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ६ जणांनी कोल्हापूर ते कन्याकुमारी व परत कोल्हापूर या मार्गाची निवड केली. बाईक रायडिंग क्षेत्रातील स्वतःच्या क्षमतांना सिद्ध करण्यासाठी असणारे बन बर्नर चॅलेंज आणि सॅंडल सोर अशी ही दोन आव्हाने कोल्हापूरच्या दुचाकीस्वारांनी आज पूर्ण केली. 

यामध्ये गौरव पाटील आणि ओमकार बुधले यांनी बन बर्नर तर पार्थ अथणे, प्रणव शिंपुकडे, सिद्धार्थ अष्टेकर, अमृत दुधाणे यांनी सॅंडल सोरपर्यंत मजल मारली.  बन बर्नर चॅलेंज पूर्ण कारण्यासाठी कोल्हापूरचे ६ जण रविवारी (ता.१५) रवाना झाले होते. या चॅलेंजमध्ये ३६ तासात २५०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा असतो. दुचाकीधारकांची महत्त्वाची मानली जाणाऱ्या आयर्न बट असोसिएशनतर्फे विविध चॅलेंजेस दिली जातात. यामधील बन बर्नर हे एक चॅलेंज आहे. हे चॅलेंज येथील ६ तरुणांनी घेतले होते. यामध्ये ओमकार बुधले आणि गौरव पाटील यांनी नियोजित वेळेमध्ये प्रवास पूर्ण करत बन बर्नर पूर्ण केला. यावरच न थांबता त्यांनी ३ हजार किलोमीटरचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्टही पूर्ण करत हे चॅलेंजदेखील पूर्ण केले. या सोबतच पार्थ अथने, प्रणव शिंपुकडे, सिद्धार्थ अष्टेकर, अमृत दुधाणे यांनी सॅंडल सोरपर्यंत मजल मारली. या मध्ये २४ तासांमध्ये १६१० किमीचा प्रवास करावा लागतो. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी या तरुणांनी कोल्हापूर ते कन्याकुमारी पुन्हा कोल्हापूर अशा मार्गाची निवड केली होती. मोहिमेची सुरूवात टोप संभापूर येथून रविवारी रात्री झाली होती. अत्यंत आव्हानात्मक अशी कामगिरी या सहा जणांनी पार करत हे चॅलेंज पूर्ण केले आहे. हे सर्वजण बायकर्स ऑफ इंडिया या कोल्हापूरच्या ग्रुपचे रायडर्स आहेत.

‘बायकर्स’कडून रस्ते सुरक्षिततेचे पालन

बायकर्स ऑफ इंडिया या कोल्हापूरच्या ग्रुपमधील २० हून अधिक दुचाकीस्वारांनी विविध आव्हाने पूर्ण केली आहेत. तसेच प्रतिवर्षी या ग्रुपकडून रस्ते सुरक्षेविषयीच्या प्रबोधन रॅलीचे आयोजनही केले जाते. या ग्रुपमधील प्रत्येक व्यक्ती रस्ते सुरक्षिततेच्या प्रत्येक बाबीचे काटेकोर पालन करते, हे या ग्रुपचे वैशिष्ट्य आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

#MyModiStory कशी झाली होती फडणवीस आणि मोदींची पहिली भेट? कार्यक्रम आयोजक ते मुख्यमंत्री...

ITR Filing Deadline: उद्यापासून 5,000 दंड; ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस, 5 मिनिटांत स्वतः करा फाईल

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

Ashok Saraf : "वक्ख्या विक्खी वुख्खू" फेम अशोक मामांना संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार जाहीर, लवकरच कोल्हापुरात सोहळा

SCROLL FOR NEXT