complete lockdown has been announced in the karnatka state every Sunday
complete lockdown has been announced in the karnatka state every Sunday 
कोल्हापूर

बेळगाव शहर पुन्हा थांबले, का ते वाचा...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - कोरोनाच्या रुग्णात मोठ्‌या प्रमाणात वाढ होत असल्याने दर रविवारी राज्यात पुर्णपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात कडक निर्बंध लागु करण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसुन येत असुन गेल्या काही दिवसांपासुन रस्त्यांवर दिसणारी गर्दी ओसरल्याने शहराने एका दिवसासाठी मोकळा श्वास घेतला आहे. नागरीकांनी लॉकडाऊनचे कठोरपणे केल्याने प्रशासनाच्या सूचनेला नागरिकांनी चांगला दिल्याचे दिसुन आले असुन कोरोनाला दुर ठेवायचे असल्यास सामाजिक अंतर राखणे आवश्‍यक असल्याच्या प्रतिक्रियाही नागरीकांतुन व्यक्‍त होत आहे.

सुरुवातीला इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात रुग्णांची संख्या कमी होती मात्र 15 दिवसात राज्यात रुग्ण संख्या झपाट्‌याने वाढत आहे त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन सरकारने दर रविवारी पूर्ण दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शनिवारी रात्री 8 वाजल्यापासुन सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण शहर आणी परिसरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पहाटेपासुनच बंद सदृश्‍य वातावरण पहावायस मिळाले. सकाळच्या सत्रात बाजारपेठेत फक्‍त दूध आणि इतर जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरु होती परंतु गर्दी कमी होती तसेच दररोज मोठ्‌या प्रमाणात गर्दी होणाऱ्या गणपती गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, काकतीवेस, खडेबाजार येथील रस्तेही निर्मनुष्य झाले होते.

धारवाड रोड, गोवावेस, चन्नम्मा सर्कल, नाथ पै सर्कल, किल्ला तलाव, संकम हॉटेल, पिरणवाडी क्रॉस, हिंडलगा गणपती आदी ठिकाणी पोलीसांनी बॅरीकेटस लावुन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चौकशी करुन सोडण्यात येत होते तर काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या युवकांना पोलीसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला काही ठिकाणी फेरीवाले व शेतकरी भाजी विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला थांबण्याचा प्रयत्न करीत होते मात्र पोलिसांनी सूचना करून त्यांना परत पाठविले. तसेच दिवसभर पोलीस शहरात फेरफटका मारुन लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरीकांनी घराबाहेर पडु नये अशा सुचना करीत होते. अनलॉक केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासुन शहरातील व्यवहार पुर्वपदावर येत होते. मात्र बेळगाव शहर आणी परीसरात कोरोनाचे वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा फक्‍त दिवस लॉकडाऊन पाळुन कोरोनावर नियंत्रण ठेवणे शक्‍य होईल असा प्रश्‍नही शहरवाशींमधुन व्यक्‍त होत आहे.

रविवारी गुरुपौर्णिमे असल्याने नागरीक फुलांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले होते मात्र फुलांची दुकाने काही वेळासाठीच सुरु ठेवण्यात आल्याने अनेकांना फुले शोधावी लागली तसेच लॉकडाऊनमुळे मंदिरेही बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे गुरु पौर्णिमेही घरातुनच साजरी करावी तसेच गुरु पौर्णिमेनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT