Confusion about school trips due to corona; Kolhapur division of ST will be hit 
कोल्हापूर

कोरोनामुळे शाळांच्या सहलींबाबत संभ्रम;  एसटीच्या कोल्हापूर विभागाला बसणार फटका 

संदीप खांडेकर

कोल्हापूर  : खासगी वाहनांद्वारे शाळा सहलींच्या आयोजनावर बंदी असून, सहलीसाठी एस. टी. गाड्यांची सक्ती आहे. परजिल्ह्यातील पर्यटनस्थळे, गडकिल्ल्यांवर सहली काढल्या जातात. शाळांच्या सहली प्रत्यक्ष भेटीद्वारे पर्यटनस्थळाबद्दल ज्ञान वाढविणाऱ्या. एस. टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचा विचार करता, एक नव्हे, दोन नव्हे, तर दोन हजारांवर एस. टी. गाड्यांची येथे नोंदणी होते. कोट्यवधीचे उत्पन्न कोल्हापूर विभागाला होते. 
यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गाड्यांची नोंदणी किती होईल, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे विभागाच्या कोट्यवधींच्या उत्पन्नावर पाणी फिरण्याची चिन्हेच आहेत. दिवाळीपासून शाळांकडून गाड्यांच्या नोंदणीस सुरवात होते. मार्चमध्ये परीक्षा होत असल्याने शाळाही जबाबदारीने व सुरक्षितरीत्या सहलींचे नियोजन करतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत सहलींचा हंगाम सुरू राहतो. 
यंदा कोरोनामुळे शाळांची प्रवेशद्वारे बंद आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अध्ययन सुरू आहे. शाळा कधी सुरू होतील, हे तूर्त सांगणे कठीण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून टळलेला नाही. कोरोनाची संचारबंदी शिथिल झाल्यानंतर एसटीची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. राज्यभरात गाड्यांची वाहतूक सुरू झाली असून, शाळांच्या सहलीसाठी गाड्या उपलब्ध आहेत. महाविद्यालयांकडूनही सहलीसाठी एसटी गाड्यांना पसंती दिली जाते. कोरोनामुळे पालकवर्ग पाल्याला सहलीसाठी पाठवणार का, हाच प्रश्‍न आहे. 

* गतवर्षी (2019) 
* कोल्हापूर विभागात 2151 एसटी गाड्यांची नोंदणी 
* यातून 2 कोटी 22 लाखांचे उत्पन्न 
* 12 आगारांतून हे उत्पन्न मिळाले 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested in Nashik : शिर्डी ते नाशिकपर्यंत पसरलंय खरातच्या पापाचं जाळं; आता SIT लावणार छडा, महाराष्ट्रात कुठे कुठे गुन्हे दाखल?

थक्क करणार क्लायमॅक्स, हमजाची धडाकेबाज एन्ट्री आणि कराचीत माजवलेला कहर, कसा आहे dhurandhar 2 ?

Latest Marathi News Live Update : बिडकीनमध्ये गॅस तुटवड्याने नागरिकांची धावपळ वाढली

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय! ‘तारीख पे तारीख’चा खेळ थांबवला! काय आहे नवा फॉर्म्युला?

संजू सॅमसनला पुढचा MS Dhoni होण्याची गरज नाही, तो...! गौतम गंभीरच्या विधानाची चर्चा; शशी थरूर यांच्या वक्तव्यावर दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT