Confusion over CPR superintendent replacement continues
Confusion over CPR superintendent replacement continues 
कोल्हापूर

सीपीआर अधिष्ठाता बदलीचा गोंधळ सुरूच

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात तीन मंत्री, त्यातील जिल्ह्यातील सुपुत्र पालकमंत्री, एक मंत्री तर थेट वैद्यकीय शिक्षण व आरोग्य खात्याचे, तरीही ऐन कोरोनाच्या लढाईवेळी येथील राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाच्या बदलीचा गोंधळ सुरू आहे. 

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोण ? हे ठरवण्याचे अधिकार आणि त्यासंदर्भातील आदेशही शासनाचे असताना कोल्हापुरात मात्र हे नको, तेच हवे, अमूक एकाला विरोध, असे सुरू झाले आहे. लोकांचे ऐकून शासनाने अधिष्ठाता कोण हे ठरवायचे? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

वर्षभरापूर्वीच या पदावर रुजू झालेल्या डॉ. मीनाक्षी गजभिये यांची तडकाफडकी जळगाव शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी बदली केली. त्यांच्या जागी प्रभारी म्हणून यापूर्वी याच पदावर काम केलेले डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती केली. हे आदेश येतात, तोपर्यंत त्यावरून राजकारण सुरू झाले. त्यातून डॉ. रामानंद यांना विरोध होऊ लागला. डॉ. गजभिये यांची बदली करा; पण डॉ. रामानंद इथे नकोत, असे वातावरण निर्माण केले. विशेष म्हणजे यात या क्षेत्राशी कोणताही संबंध नसलेल्यांची संख्या जास्त होती. 

त्यातून या बदल्यांना तोंडी स्थगिती दिली. तोपर्यंत काल रात्री डॉ. गजभिये यांनी अचानक पदाचा कार्यभार सोडून जळगावची वाट धरली. रातोरात जळगाव चाललेल्या डॉ. गजभिये यांनी पहाटे नाशिकमध्ये पोहचल्यावर जळगावला न जाण्याचे आदेश देत पुन्हा कोल्हापुरात आहे त्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश दिले. अजून डॉ. गजभिये कोल्हापुरात आलेल्या नाहीत; पण ऐन कोरोना विरोधातील लढाईवेळी अधिष्ठाता सारखे महत्त्वाचे पद रिक्त आहे. 

वादावर पडदा टाकण्याची गरज 
जिल्ह्यात तीन मंत्री आहेत, हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री, तर पालकमंत्री सतेज पाटील हे कोल्हापूरचे सुपुत्र आहेत. दोन महिन्यांपासून श्री. पाटील हे कोरोना रोखण्यासाठी ठाण मांडून कोल्हापुरात आहेत. या दोघांनी ठरवले, तर अधिष्ठाता पदाचा हा खेळखंडोबा थांबेल; पण त्यांच्याकडूनही तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हेही कोल्हापूरचे आणि विशेष म्हणजे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री; पण त्यांना या घडामोडी माहीत आहेत का नाही?, असे त्यांच्या यातील एकूणच सहभागावरून वाटते. आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाचे अमित देशमुख कॅबिनेट मंत्री आहेत. पालकमंत्री पाटील व श्री. देशमुख हे दोघेही कॉंग्रेसचे, त्यात या दोघांतील घरोबाही चांगला आहे. या जोरावर श्री. पाटील यांनीच या वादावर पडदा टाकण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT