Confusion situation in CPR from quarantine in Kolhapur 
कोल्हापूर

मनस्ताप ः कोल्हापुरात क्वॉरंटाईनवरून सीपीआरमध्ये गोंधळाची स्थिती

प्रतिनिधी

कोल्हापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांना घरीच अलगीकरण करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर मार्गदर्शक सुचना न आल्याने यावरून छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. 
जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरीकांची सीपीआर व डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तपासणी केली जाते. यापुर्वीच्या आदेशानुसार लक्षणे नसलेल्यांचा स्वॅब न घेता त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरणात पाठवले जाते तर लक्षणे असलेल्यांच्या स्वॅब तपासणीसाठी घेऊन त्याचा अहवाल येईपर्यंत क्वॉरंटाईन करण्यात येते. आजच्या नव्या आदेशामुळेच बाहेरून आलेले नागरीक व सीपीआर प्रशासनाता वादाचे खटके उडत होते. 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचप्रमाणे कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे; पण मुंबईसह, पुणे, औरंगाबाद शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून पॉझिटीव्ह आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना ठेवून रुग्णालये भरली आहेत. या पार्श्‍वभूमीवर शासनाने पॉझिटीव्ह रुग्णांना घरी सोय असेल आणि त्यांची काळजी घेण्यासाठी व्यक्ती असेल तर अशांसाठी घरी ठेवता येईल, असे आदेश काढले आहेत; पण याबाबत स्थानिक पातळीवर काय करायला पाहिजे याच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे सीपीआरमध्ये आल्यानंतर स्वॅब घेतलेल्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो; मात्र शासनाने आज काढलेल्या आदेशाचा संदर्भ देऊन तपासणीसाठी येणारे लोक होम क्वॉरंटाईनसाठी आग्रह धरत आहेत. यावरून सीपीआर प्रशासना आणि नागरीकांत वादाचे प्रसंग घडत आहेत. 


ज्या जिल्ह्यात क्वारंटाईन करण्याची क्षमता संपली आहे अशा जिल्ह्यातील लोकांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 12 हजार लोकांना क्वारंटाईन करण्याची क्षमता आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. 
- दौलत देसाई, जिल्हाधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुढेंच्या कारवाईनंतर सरकारही अ‍ॅक्शन मोडमध्ये... खोकल्याच्या सिरपबाबत आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!

Pune News: ज्ञानमंदिरांच्या दारातच नशेचा बाजार! राजगुरुनगरात शाळा-महाविद्यालयांजवळ गुटखा, सिगारेटची खुलेआम विक्री

IND A vs AFG A : जर वैभव सूर्यवंशीवर बंदी आली, तर भारताकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला जागा मिळणार?

एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितलं Body Stifness आणि वेदनांचं खरं कारण

CA जॉबचं आमिष, बार गर्लला लग्नाचं स्वप्न, बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीचे संबंध... मुंबईत भाजपच्या बड्या नेत्याचा काळा चेहरा उघड

SCROLL FOR NEXT