confusion of starting school persists Extension for teacher swab test 
कोल्हापूर

शाळा सुरू करण्यातील संभ्रम कायम ; शिक्षकांच्या स्वॅब टेस्टसाठी मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिक्षकांच्या स्वॅब टेस्ट झालेल्या नाहीत. पालकांची संमतिपत्रे जमा नाहीत. त्यामुळे शाळा सुरू करायची की नाही, असा संभ्रम शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनात आहे. पालकांना अद्यापही कोरोनाची भीती कायम असून, उद्या (ता. २३) शाळा सुरू होणार का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. शिक्षकांच्या स्वॅब टेस्टसाठी ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. 

कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वर्ष दिवाळी झाली तरीही सुरू झाले नाही. राज्य सरकारने उद्यापासून नववी आणि दहावी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता; पण मुंबईतील शाळांनी त्याला विरोध केला. अखेर शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असा निर्णय झाला. मात्र, जिल्ह्यात प्रशासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. शिक्षकांच्या स्वॅब टेस्ट अजून अपूर्ण आहेत.

बहुतांश शाळांनी पालकांना संमतीपत्रांसंदर्भात कल्पना दिलेली नाही. त्यामुळे संमतीपत्रेही जमा झालेली नाहीत. अशा सर्व गोंधळात आज शाळा सुरू होणार की नाही, याबाबत कोणतीही ठोस माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. ज्या शाळांची सर्व तयारी झालेली आहे, शिक्षकांच्या टेस्ट पूर्ण आहेत, संमतीपत्र जमा झालेले आहेत, त्यांनी शाळा सुरू करण्यास हरकत नाही, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले. या सर्व पार्श्‍वभूमीवर शाळा नेमक्‍या कधी सुरू होणार, याबाबत पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात संभ्रम आहे.

प्रमुख अडचणी
  शिक्षकांच्या स्वॅब टेस्ट अद्याप अपूर्ण
  सर्व पालकांची संमतिपत्रे जमा नाहीत
  शाळांचे निर्जंतुकीकरण सुरू आहे
  स्थानिक प्रशासनाचा ठोस निर्णय नाही
नाशिकमधील शाळा 
४ जानेवारीपर्यंत बंद

 संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Leader Death : भाजपच्या महिला नेत्याचा धक्कादायक मृत्यू, पिस्तुलातून गोळी सुटली अन्... नेमकं काय घडलं?

Video: टीम इंडियाचं कर्णधारपद गमावलं, पण श्रेयस समोर दिसताच सूर्याने दाखवलं मोठं मन! म्हणाला, 'तो आता नेतृत्व...

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Satara:सरकारी योजनेनं घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण वादळानं हिरावलं; शेवटचा हप्ता मिळण्याआधीच अस्मानी संकटात कुटुंब उघड्यावर

SCROLL FOR NEXT