Congress leader Satej Patil
Congress leader Satej Patil  esakal
कोल्हापूर

Loksabha Election : 'पत्ते पिसलेले आहेत, त्यातील हुकमी एक्का आमच्याकडे आहे'; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

सकाळ डिजिटल टीम

2019 च्या विधानसभा निवडणुकीला यापूर्वी शिवसेनेला अनुभव आला होता. आता निर्णय घेतला तर त्याला सामोरे गेलेच पाहिजे’, असा सल्ला सतेज पाटील यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना दिला.

कोल्हापूर :लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पत्ते व्यवस्थित पडतील, पत्ते पिसलेले आहेत, त्यातील ‘हुकमी एक्का’ आमच्याकडे आहे, योग्यवेळी आघाडीचा निर्णय होईल’, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये (Dr. D. Y. Patil Hospital) आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘महायुतीमध्ये गडबड आहे; पण हळूहळू बाहेर पडेल. महाविकास आघाडीमध्ये जे काही ठरले ते वरिष्ठ नेते माध्यमांसमोर सांगतील.’

शुक्रवारी विधिमंडळाबाहेर सत्ताधारी पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीबद्दल बोलताना पाटील म्हणाले,‘महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही हाणामारीच्या घटना घडलेल्या नाहीत. सत्ताधारी आमदारांमध्ये हाणामारीचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. विधिमंडळातील महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही उपलब्ध नाही, हे वाईट आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने असा प्रकार विधिमंडळात घडत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट नाही.’ ‘भाजपचा इतिहास सर्वांना माहीत आहे. माहीत असूनही तुम्ही चुकीचा निर्णय घेतला यात चूक कुणाची? आता पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीला यापूर्वी शिवसेनेला अनुभव आला होता. आता निर्णय घेतला तर त्याला सामोरे गेलेच पाहिजे’, असा सल्ला सतेज पाटील यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना दिला. ‘लोकप्रतिनिधी कायदा हातात घेत आहेत. कारवाई होत नसल्यानेच त्यांचे धाडस वाढले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असे ते आमदार संजय गायकवाड यांच्या हाणामारीच्या व्हिडिओवरून म्हणाले.

डाटा पक्ष कार्यालयात कसा?

‘गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पीएम किसान योजना आणि उज्ज्वला गॅस योजनेसंदर्भातील ऑडिओ रेकॉर्डिंग कॉल हे समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना कॉल सेंटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करून कॉल करणे सुरू आहे. संबंधित व्यक्तींना या योजनांतून लाभ मिळाला आहे का? त्याबाबत तुम्ही समाधानी आहेत का, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. योजनांची माहिती पक्ष कार्यालयात कशी? असा सवाल करून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT