Kolhapur LokSabha Election Nana Patole esakal
कोल्हापूर

कोल्हापुरातून 'या' हुकुमी एक्क्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी; पटोलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

कोल्हापूरसह सांगली व सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे (Congress) घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ डिजिटल टीम

ऐनवेळी कुठल्याही पक्षाला उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विजयासाठी सहकार्य करा’, असे आवाहन पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी केरळचे आमदार रमेश चेन्नीथल्ला यांनी केले.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तयारीसाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत लावण्यात आलेल्या पोस्टरवर विधान परिषदेचे गटनेते असूनही आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांचा फोटो नव्हता. यावरून कोल्हापुरातून या बैठकीला गेलेल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना धारेवर धरले. यावर नेत्यांनी सावरासावर करून त्यावर पडदा टाकला.

दरम्यान, ‘कोल्हापूरसह सांगली व सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे (Congress) घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी म्हणून तसा दावा करू, पण ऐनवेळी कुठल्याही पक्षाला उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विजयासाठी सहकार्य करा’, असे आवाहन पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी केरळचे आमदार रमेश चेन्नीथल्ला यांनी केले.

लोकसभेच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसकडून विभागनिहाय मेळावे आयोजित केले आहेत. आज पश्‍चिम महाराष्ट्राचा मेळावा होता. त्यासाठी कोल्हापुरातून आमदार प्रा. जयंत आसगांवकर, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, राजू आवळे यांच्यासह शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शशांक बावचकर, तौफिक मुल्लाणी सूर्यकांत पाटील, संजय पोवार उपस्थित होते.

सतेज पाटील यांनाच उमेदवारी देऊ

‘काँग्रेस कोल्हापूरसह सांगली, सोलापूर मतदारसंघांसाठी आग्रही आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाली तर आमदार सतेज पाटील यांनाच उमेदवारी देऊ’, असे पटोले म्हणाले. ‘त्यावर तुम्ही कोल्हापुरातून लढला तरी आम्ही तुम्हाला विजयी करू’, असे आश्‍वासन सचिन चव्हाण यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT