Congress MLA PN Patil  esakal
कोल्हापूर

Congress MLA : आमदार पी. एन. पाटील यांची प्रकृती गंभीरच; बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने मेंदूला गंभीर दुखापत

पाटील यांची प्रकृती चांगली व्हावी, यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गावागावांतील मंदिरात देवांना अभिषेक घालून प्रार्थना करण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईचे सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. सुहास बराले यांच्याकडून त्यांच्या प्रकृतीची पाहणी करण्यात येते. आज ॲस्टर आधार हॉस्पिटलने मेडिकल बुलेटिन जाहीर करून त्यांची प्रकृती गंभीरच असल्याचे जाहीर केले.

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या आमदार पी. एन. पाटील (P. N. Patil) यांची प्रकृती गंभीरच आहे. त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने रविवारपासून त्यांची प्रकृती ‘जैसे थे’ आहे. काल सकाळच्या पाहणीत त्यांचे मूत्रपिंडही (Kidney) योग्य त्या क्षमतेने काम करत नसल्याचे आढळून आले.

दरम्यान, पाटील यांची प्रकृती चांगली व्हावी, यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गावागावांतील मंदिरात देवांना अभिषेक घालून प्रार्थना करण्यात येत आहे. आजही रुग्णालयाबाहेर त्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांनी गर्दी केली होती. रविवारी (ता. १९) सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने पाटील यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती.

सिटीस्कॅनमध्ये त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे निदान झाले होते. त्याच दिवशी त्यांच्यावर ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काल पुन्हा त्यांच्या डोक्याचे स्कॅनिंग केले असता नव्याने त्या ठिकाणी रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले नाही; पण ते अजूनही बेशुद्ध आहेत. त्यांना कृत्रिम श्‍वासोच्छ्‌वास देण्यात आला असून गेल्या तीन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवरच आहेत.

मुंबईचे सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. सुहास बराले यांच्याकडून त्यांच्या प्रकृतीची पाहणी करण्यात येते. आज ॲस्टर आधार हॉस्पिटलने मेडिकल बुलेटिन जाहीर करून त्यांची प्रकृती गंभीरच असल्याचे जाहीर केले. मेंदूत झालेला रक्तस्त्राव व त्यानंतर येणारी मेंदूची सूज या सर्व गोष्टी लक्षात घेता यातील सुधारणांसाठी आता काळजी वाटत असल्याचे हॉस्पिटलने म्हटले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. उल्हास दामले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

SCROLL FOR NEXT