Congress MP Rahul Gandhi met Ajit Tukaram Sandhe Family esakal
कोल्हापूर

Kolhapur: नेता असावा तर असा! कुठल्याही हॉटेलला न जाता राहुल गांधींनी गाठलं थेट टेम्पोचालकाचं कौलारू घर; कोणाची घेतली भेट?

Congress MP Rahul Gandhi : राहुल गांधी कुठल्याही हॉटेलला न जाता त्यांनी थेट उचगावमधील एक कौलारू घर गाठलं.

सकाळ डिजिटल टीम

संधे कुटुंबानंही राहुल गांधींचा पाहुणाचार करत त्यांना घरीच नाश्ता बनवून खायला दिला. अजित संधे टेम्पोचालक आहेत.

कोल्हापूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, कोल्हापुरातील कसबा बावड्यामधील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) त्यांच्या हस्ते नुकतेच अनावरण झाले.

तत्पूर्वी, आज सकाळी राहुल गांधी कोल्हापूर विमानतळावर (Kolhapur Airport) दाखल झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार सतेज पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर राहुल गांधी कुठल्याही हॉटेलला न जाता त्यांनी थेट उचगावमधील एक कौलारू घर गाठलं.

Congress MP Rahul Gandhi met Ajit Tukaram Sandhe Family

राहुल गांधींनी थेट कौलारू घर गाठलं

तिथं राहुल गांधींनी घरगुती जेवणाचा आस्वाद घेत पुढं नियोजित कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यांच्या या साध्या राहणीमानाचं कौतुक होतं आहे. उचगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अजित तुकाराम संधे (Ajit Tukaram Sandhe) यांच्या घरी राहुल गांधी यांनी भेट दिली. याठिकाणी जवळपास अर्धा तास राहुल गांधींनी संधे कुटुंबाशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी कुटुंबाकडे संविधानाची प्रत सुपुर्द केली.

Congress MP Rahul Gandhi met Ajit Tukaram Sandhe Family

संधे कुटुंबाकडून राहुल गांधींचा पाहुणाचार

संधे कुटुंबानंही राहुल गांधींचा पाहुणाचार करत त्यांना घरीच नाश्ता बनवून खायला दिला. अजित संधे टेम्पोचालक आहेत. त्यांचं सर्वसामान्य गरीब कुटुंब आहे जे उचगावात राहतात. या भेटीनंतर काँग्रेस आमदार विश्वजित कदम म्हणाले, गांधी कुटुंबाचा डीएनए गोरगरिब कुटुंबासोबत राहणं, सर्वसामान्य लोकांत मिसळणं, त्यांच्या सुखदुख:त सहभागी होणं हे आहे. गांधी कुटुंबाची ही परंपरा राहुल गांधी जोपासताना दिसत आहेत. कोल्हापूर शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातील लोकांशी संवाद साधत त्यांचं जीवनमान समजून घेण्यासाठी आले होते ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे, असं ते म्हणाले. राहुल गांधींनी गरीब कुटुंबाची भेट घेतल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

SCROLL FOR NEXT