The Connection Of Street Lights In Jadhewadi Was Disrupted Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

जाधेवाडीत एका तारेसाठी अडली पथ दिव्यांची जोडणी

अशोक तोरस्कर

उत्तूर : जाधेवाडी (ता. आजरा) येथील पथ दिव्यांची जोडणी केवळ एका तारेसाठी खोळंबली आहे. गेली सहा वर्षे महावितरणबरोबर ग्रामपंचायतीचा पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र यामध्ये यश मिळालेले नाही. 
गावची लोकसंख्या 800 आहे. गावाबाहेर लोकवस्ती वाढली आहे. या ठिकाणच्या नागरिकांना वीज पुरवठा व्हावा म्हणून 24 विद्युत पोल उभारले.

या खांबावरून नागरिकांना घरगुती जोडणी उपलब्ध झाला. मात्र रस्त्यावरील दिवे सुरू करण्यासाठी एका तारेची गरज होती. ही एक तार बसवावी व गावात प्रवेश करताना असलेली धोकादायक डी. पी. हलवावी यासाठी ग्रामपंचायतीने महावितरण बरोबर पत्र व्यवहार केला.

जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना भेटून गाऱ्हाणे मांडले, मात्र याचा उपयोग झाला नाही. निधी उपलब्ध नसल्याने काम करता येत नाही अशी उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांना मात्र रात्रीच्यावेळी अंधारातून चाचपडत ये-जा करावी लागत आहे. याबाबत महावितरणचे सहाय्यक अभियंता देसाई यांच्यासी संपर्क साधला असता डी. पीबाबत लवकरच सर्व्हे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

वाढीव वस्तीमध्ये गरज
2014 मध्ये सहा वर्षापुर्वी सरपंच असताना महावितरणला पत्र दिले होते. याची दखल घेतली गेली नाही. वाढीव वस्तीमध्ये रस्त्यावर वीजेची गरज आहे. 
- रघूनाथ सावंत, उपसरपंच, जाधेवाडी 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT