shivaji university exam 
कोल्हापूर

विद्यापीठीय परीक्षा घेण्याचा 'असा' चाललाय विचार...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - विद्यापीठाच्या सर्व प्रलंबित परीक्षा तीन सत्रांमध्ये घेण्याबाबतचा विचार आज परीक्षा समितीच्या बैठकीत करण्यात आला. तसेच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका यांचे निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्ससिंग, कसे करता येईल यावरही चर्चा झाली. दुपारी ११ ते १.३० या वेळेत ऑनलाईन पद्धतीने बैठक झाली.

कोरोनाचा  प्रादुर्भाव टाळण्यासाठी विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. या परीक्षा जुलैमध्ये होतील असा अंदाज आहे. त्याअनुषंगाने शिवाजी विद्यापीठाने एक स्वतंत्र परीक्षा समिती नेमली आहे. समितीची पहिली बैठक आज ऑनलाइन पद्धतीने झाली. यामध्ये २७ प्रतिनिधी सहभागी झाले होते. सुरुवातीला कुलगुरू डॉ देवानंद शिंदे यांनी समितीचा उद्देश सांगितला. समितीकडून विद्यापीठाला अपेक्षित असणाऱ्या कामाबाबत ही कुलगुरूंनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येकाची समितीमधील जबाबदारी निश्चित करण्यात आली. तसेच त्यांनी काय काम करणे अपेक्षित आहे ते देखील सांगण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यात आला. तसेच जुलै महिन्यात काही भागात पूरस्थितीचा धोका संभवतो त्या अनुषंगाने ही उपाय योजनांची चर्चा बैठकीत करण्यात आली. राज्य समितीच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर नवे वेळापत्रक बनवण्याचे  बैठकीत ठरविण्यात आले.

यावेळी समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ डी.जी. कणसे, प्रकुलगुरू डॉ डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

तीन सत्रातील परीक्षा विचाराधीन

सोशल डिस्टन्ससिंग पाळता यावे यासाठी तीन सत्रात परीक्षा घेता येईल का याचा विचार बैठकीत करण्यात आला. यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२ ते १, आणि ३ते ५ या वेळांमध्ये पेपर घेण्याचा विचार झाला असून अद्याप निर्णय झालेला नाही.
 

विद्यापीठाच्या परीक्षा समितीची पहिली बैठक सकारात्मक झाली. परीक्षा घेण्यासंदर्भात प्रत्येकाने आपले विचार समिती समोर ठेवले. बैठकीमध्ये जबाबदाऱ्यांची निश्‍चिती करण्यात आली. राज्य समितीच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर परीक्षेचे स्वरूप व वेळापत्रक ठरवण्यात येईल.
 - प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT