Consolation to the co-operatives, election postponed again 
कोल्हापूर

सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा, निवडणुका पुन्हा लांबणीवर 

निवास चौगले

कोल्हापूर ः कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नव्या आदेशानुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत निवडणुकींना शासनाने आज स्थगिती दिली. जिल्ह्यातील प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ), जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह अनेक साखर कारखाने व छोट्या मोठ्या चार हजार संस्थांचा यात समावेश आहे. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने 23 मार्चपासून देशभर लॉकडाउन जाहीर केले. त्यातून पहिल्यांदा 18 मार्च 2020 रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुका पहिल्यांदा तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या. तीन महिन्यांनंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने 17 जून 2020 रोजी दुसऱ्यांदा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. ही मुदत आज संपल्याने व कोरोनाची परिस्थिती "जैसे थे' असल्याने शासनाने या निवडणुकींना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. 
जिल्ह्यात "गोकुळ'च्या विद्यमान संचालकांची मुदत 13 एप्रिल रोजी, तर जिल्हा बॅंकेच्या संचालकांची मुदत मे 2020 रोजी संपली आहे. याशिवाय जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांची मुदतही जून 2020 पर्यंत संपली आहे. त्याचबरोबर प्राथमिक दूध संस्था, विकास सोसायट्या यांच्याही विद्यमान संचालकांची मुदत यापूर्वीच संपली आहे. अशा सुमारे चार हजार संस्थांच्या निवडणुका या निर्णयाने पुन्हा लांबवणीवर पडणार आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; तर उर्वरित राज्याला वादळी पावसाचा इशारा

बिहारमध्ये सत्तेचा मोठा ट्विस्ट! नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण? ४ दिग्गज नेते रेसमध्ये; कोण मारणार बाजी?

Pune : पोलीस कोठडीत पूजा करायचीय! ऋषिकेश वैद्यची कोर्टाकडे अजब मागणी

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

SCROLL FOR NEXT