Contact tracing became less, challenging the administration to find the contact of each victim 
कोल्हापूर

कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग झाले कमी, प्रत्येक बाधिताचा संपर्क शोधण्याचे प्रशासनासमोर आव्हान

सदानंद पाटील

कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात समाधानाचे वातावरण आहे, मात्र कोरोना बाधित रुग्णांचे कॉन्टक्‍ट ट्रेसिंग कमी पडत असल्याने व दुसरीकडे लोक घरातच गुपचूप उपचार करत असल्याने, स्वॅब देण्यास टाळाटाळ होत असल्याने बाधितांची आकडेवारी कमी-जास्त होत आहे. सर्वसाधारणपणे 1 कोरोना बाधित रुग्ण सापडला तर किमान त्याच्या संपर्कातील किमान 15 ते 25 लोकांचा शोध घेणे आवश्‍यक आहे, मात्र संपर्क यंत्रणा ढेपाळल्याने एका बाधित रुग्णाच्या मागे केवळ 6 ते 7 लोकांचा संपर्क होत आहे. त्यामुळे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगमध्ये जिल्ह्याची घसरगुंडी उडाली आहे. प्रत्येक बाधित रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्कमध्ये असलेल्या लोकांचा शोध घेणे मोठे आव्हान आहे. 
कोरोनाला रोखण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून काम करणारी यंत्रणा आता ढेपाळत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगची जबाबदारी आहे, असे अनेक घटक "हे आमचे काम नसून, ते आरोग्य विभागाचे आहे.' असे सांगत जबाबदारी झटकू लागले आहेत. तालुका, गाव आणि शहरातील प्रभाग स्तरावील समित्याही थंड पडू लागल्या आहेत. या सर्वाचा परिणाम बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात होत आहे. जर व्यवस्थित कॉन्टक्‍ट ट्रेसिंग झाले नाही तर रुग्णसंख्या वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
कोरोनाला रोखण्यासाठी कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एक कोरोना बाधित रुग्ण सापडला तर संबंधित व्यक्‍तीच्या घरातील व्यक्‍ती, नोकरी-उद्योग असेल तर तेथील लोक, पंधरा दिवसांच्या कालावधीत भेटलेले लोक यांची यादी करावी लागते. यातही हाय रिस्क, लो रिस्क अशी यादी तयार करण्यात येते, मात्र या यादीतच त्रुटी असल्याने बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. कोरोना बाधित लोक हेदेखील संपर्कातील लोकांची माहिती देत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. 
... 
एचआरसीटी अहवालाचा आधार 
कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगमध्ये यंत्रणा कमी पडत असल्याने आता एचआरसीटीच्या आधारे संपर्क साधला जाणार आहे. या अहवालात एखादी व्यक्‍ती कोरोना बाधित आढळली तर लगेच त्या व्यक्‍तीच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जाणार आहे. पूर्वी फक्‍त स्वॅबच्या आधारेच संपर्क शोधण्यात येत होता, मात्र लॅबकडून सध्या तरी एचआरसीटीत पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांचीच माहिती दिली जात आहे. 
.... 

कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग कमी पडत आहे, ही वस्तुस्थिती आहे. पुन्हा नव्याने काही नियोजन करण्यात येत आहे. बाधित लोकांनी संपर्कातील लोकांची माहिती देणे आवश्‍यक आहे. जेवढी माहिती व्यवस्थित असेल तेवढे लोकांचा शोध घेणे सोपे होणार आहे, मात्र सध्या तरी बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे मोठे आव्हान आहे. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी. 

22 सप्टेंबर अखेर बाधित रुग्णांच्या संपर्काची स्थिती 
एकूण कोरोना बाधित रुग्ण -41699 
हाय रिस्क रुग्ण - 149,996 
लो रिस्क 46,243 
एकूण संपर्क 196,239 
संपर्क शोधण्याची टक्केवारी .4071 

-संपादन यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

Wani News : मार्कंडेय पर्वतावर पुन्हा ‘बंदी’चा डोंगर! चार वर्षांत धोकादायक शिड्या-पायवाटांची दुरुस्ती नाही, भाविकांचा संताप

SCROLL FOR NEXT