Kolhapur News Esakal
कोल्हापूर

Kolhapur News: अंबाबाई मंदिर परिसरात मोठा राडा! मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पलस्टँड काढण्यावरून वाद

कोल्हापुरमध्ये अंबाबाई मंदिर परिसरात मोठा राडा सुरू आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

कोल्हापुरमध्ये अंबाबाई मंदिर परिसरात मोठा राडा सुरू आहे. खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पल स्टँड काढण्यावरून वाद निर्माण झाला आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल स्टँड काढण्यावरुन वाद सुरु झाला आहे. खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पलस्टँड काढण्यावरून हा वाद सुरु झाला आहे. यावेळी पोलीस आणि चप्पल स्टँडवाल्यांमध्ये झटापट देखील झाली.

अंबाबाई मंदिर परिसरातील चप्पलस्टँड हे बेकायदेशीर असल्याचे म्हणत महानगरपालिकेने ते हटवण्याची मोहीम सकाळी सुरू केली होती. यावेळी चप्पल स्टँड चालकांनी त्यांना कडाडून विरोध केला. (Marathi Tajya Batmya)

विरोध करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त होते. चप्पल स्टँड चालकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. महिला पोलिसांनी विरोध करणाऱ्या महिलांना फरफटत तिथून बाहेर काढले. कारवाई सुरु झाल्यानंतरही चप्पल स्टँड चालकांनी तो रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस बळासमोर त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत.

महापालिकेने जेसीबीच्या माध्यमातून अंबाबाई मंदिराच्या भिंतीला लागून असलेली सर्व दुकाने हटवण्यात आली आहेत. यावेळी दुकानदारांनी कारवाईस विरोध केला. तरीही अतिक्रमण विभागाने आपली कारवाई सुरू ठेवली. मंदिराच्या भिंतीला लागून असणारी सर्व दुकाने यावेळी काढण्यात आली आहेत.(Latest Maharashtra News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT