sangli  sakal
कोल्हापूर

Sangli : सहकार, परिवर्तन पॅनेलमध्ये जोरदार लढत

प्रचारासाठी बैठकांवर भर; विविध विभागांच्या पाठिंब्यासाठी आटापिटा

सकाळ वृत्तसेवा

सांगली : दि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटी निवडणूक प्रचाराने जोर पकडला आहे. अखेरच्या टप्प्यात एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत रंग भरला आहे. सत्तारूढ जय सहकार पॅनेल विरोधात परिवर्तन पॅनेल अशी चुरशीची लढत आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या सोसायटीचे चार हजार ९६० सभासद आहेत. दोन्ही पॅनेलचे नेते, उमेदवारांनी प्रचारासाठी बैठका आणि विविध विभागांच्या बैठकांवर भर दिला आहे. कार्यालयीन वेळेत मतदार सभासदांना भेटून आपापली भूमिका पटवून दिली जातोय.

‘सॅलरी’साठी १९ जागांसाठी दोन गटांत सरळ लढत आहे. ६ ला मतदान होणार आहे. सॅलरी सोसायटीची मागील निवडणूक अत्यंत चुरशीने झाली होती. संस्थेच्या इतिहासात केवळ तीन वेळा सत्ताबदल झाला आहे. यंदाही सत्तारूढ गटाकडून पुन्हा विजयासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. विरोधी गटाकडे सत्ताधारी गटातील माजी अध्यक्ष अभिमन्यू मासाळ सहभागी झाल्यामुळे पॅनेलची ताकद वाढली आहे.

गेल्या सहा वर्षांतील पारदर्शी कारभारावर सत्ताधाऱ्यांना पुन्हा विजयाची खात्री आहे. विरोधकांकडून गैरव्यवहाराचे सातत्याने आरोप करून सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. सत्ताधारी गटाने जुन्या-नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे, तर विरोधी गटाने नव्या दमाचे उमेदवार रिंगणात उतरवलेत.

सत्ताधारी गटाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते डी. जी. मुलाणी, जे. के. महाडिक, पी. एन. काळे, सुरेंद्र पेंडूरकर, दिलीप पाटील, पी. वाय. जाधव, एस. एन. सूर्यवंशी, एस. एस. पाटील, सी. एच. पाटील, प्रदीप कदम, संजय व्हनमाने, तर विरोधी गटाचे नेतृत्व बजरंग कदम, नितीन कुलकर्णी, नंदू ढोबळे, विक्रम रजपूत आदी करीत आहेत. त्यांना पाठिंबा दिलेल्यामध्ये संघटनांचे नेते गणेश मडावी, प्रतिमा हेटकाळे, सुभाष पाटील, संपतराव पवार, कोल्हापूरचे संजय क्षीरसागर, दत्ता कोळी, राजू कदम, संजय आवटी, संजय पोरे, संजय कांबळे, संदीप पाखरे आदी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT