The core committee of the parties is quiet, 
कोल्हापूर

पक्षांची कोअर कमिटी शांत, निवडणूक जाहीर होईल तेव्हा पाहू, अशीच सदस्यांची भुमिका

युवराज पाटील

कोल्हापूर ःमहापालिका निवडणूकीची चर्चा थांबली अन्‌ विविध राजकीय पक्षांनी नेमलेल्या कोअर कमिटीही शांत झाल्या. आता निवडणूक लागेल तेव्हा पाहू अशीच सदस्यांची सघ्याची भुमिका आहे. 
आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने तात्काळ कोअर कमिटी नेमली. यात शहराध्यक्ष आर.के. पोवार, अजित राऊत, विनायक फाळके, आदिल फरास, राजू लाटकर आदिंचा समावेश होता. समितीच्या एक दोन बैठकाही पार पडल्या. संभाव्य उमेदवार कोण असतील, यावर चर्चा झाली. आरक्षण सोडत झाली. डिसेंबररमध्ये आणि मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला फेब्रुवारीत. 
अन्य पक्षांच्या कोअर कमिटी स्थापन होते, म्हटल्यावर भाजपने समिती नियुक्त केली. प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक व महेश जाधव यांना समितीचे प्रमूख करण्यात आले. भाजप ताराराणी आघाडीने संयुक्तपणे समिती नेमली. भाजपचा प्रभागनिहाय सर्व्हे झाला. कोणत्या भागात कोणत्या उमेदवाराला पसंती दिली गेली, याची माहिती सर्व्हेतून मिळाली. कॉंग्रेसने सर्व्हेचे काम पूर्ण करून घेतले. उमेदवार निश्‍चित करून तिकीटाचे वाटप करणे ही समिती सदस्यांची जबाबदारी होती. निवडणूक जशी लांबणीवर पडत गेली, तसे समितीच्या कामालाही मर्यादा आल्या. कोरोनामुळे निवडणूक होईल की नाही याचा काही नेम नाही अशा स्थितीत चर्चा करून करायचे काय असा प्रश्‍न सदस्यांना पडला आहे. 
महापालिका निवडणूकीत पुर्वी कोअर कमिटी आस्तित्वात नव्हती. कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार द्यायचा, याचा निर्णय नेत्यांच्या स्तरावर व्हायचा. आता नेतेमंडळी राज्याच्या राजकारणात व्यस्त आहेत. पालकमंत्री सतेज पाटील हे कॉंग्रेसची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीची तर चंद्रकांत पाटील हे भाजपची धुरा सांभाळत आहेत. 
राज्यस्तरावरील घडामोडीतून स्थानिक स्तरावर लक्ष देणे शक्‍य नसल्याने कोअर कमिटीची स्थापना झाली. निवडणूक तात्काळ लागेल या अपेक्षेने समिती सदस्यांनी आपल्याच नावाला पसंती द्यावी, यासाठी वशिलबाजी सुरू झाली. अखेर निवडणुकीबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आणि सर्व काही शांत झाले. कोअर कमिटी सदस्य निवडणूकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच पुन्हा कामाला लागतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT