Corona affected area becomes 'containment zone' 
कोल्हापूर

साळोखेनगरात कोरोना बाधीत परिसर झाला "कंटेन्मेंट झोन' 

सुयोग घाटगे

कोल्हापूर : कृष्णराव साळोखेनगर येथे कोरोना रुग्ण आढळल्यामुळे परिसर सील केला. परिसरातील व्यवसायदेखील बंद केले आहेत. वैद्यकीय पथक घरोघरी जाऊन बाधिताच्या संपर्काची माहिती घेत आहे. येथील कृष्णराव साळोखेनगर येथील 53 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

खासगी रुग्णालयातील तपासणीचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. त्याच्या कुटुंबीयांना आणि तीव्र संपर्कातील व्यक्तींना खबरदारी म्हणून तपासणीसाठी सीपीआरमध्ये नेले आहे. परिसरातील प्राध्यापक कॉलनी, साई कॉलनी येथील काही भागदेखील बंदिस्त केला आहे. परिसरामध्ये औषध फवारणी केली असून आरोग्य सेवकांच्या वतीने प्रत्येक घरी जाऊन माहिती संकलनाचे काम सुरु आहे. या प्रभागांमधील हा पहिला रुग्ण असल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

बाधित रुग्ण स्थानिक डॉक्‍टरांच्या सल्ल्याने खासगी दवाखान्यामध्ये दाखल झाला होता. काही दिवसांपासून दाखल असणाऱ्या या रुग्णाचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. आरोग्य यंत्रणेकडून या स्थानिक डॉक्‍टरसह घरामध्ये इतर कामासाठी येणाऱ्यांची माहिती घेण्यात येत आहे. 

अनेक कुटुंबे भितीच्या छायेत... 
येथे घरकामास असणारी महिला परिसरातील अनेक घरांत कामे करत होती. यामुळे अनेक कुटुंबीय भीतीच्या छायेत आहेत. आरोग्य सेवकांच्याकडून या महिलेला फोन लावण्यात येत होते मात्र ती महिला फोन उचलत नाही. या महिलेशी संपर्क साधण्याचे आणि माहिती मिळवण्याचे इतर प्रयत्न आरोग्य यंत्रणेकडून सुरू होते. 

दृष्टिक्षेप 
- साळोखेनगर परिसरातील व्यवसायही बंद 
- घरोघरी जाऊन बाधीताच्या संपर्काची घेतली जातेय माहिती 
- कुटुंब व संपर्कातील व्यक्ती तपासणीसाठी सीपीआरमध्ये 
- परिसरात औषध फवारणी व स्वच्छता 


संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT