Corona at the center of the discussion of citizens in rural areas 
कोल्हापूर

दारातनं एसटी धावलं ; तवाच कोरोना संपला म्हणायचा !

अवधूत पाटील

गडहिंग्लज (कोल्हापूर) - दोन-तीन महिन्यांपूर्वी ध्यानीमनी नसणाऱ्या कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. सुरवातीला अनभिज्ञ असणाऱ्यांच्याही आता तो तोंडी आला आहे. साहजिकच कोरोनाने चर्चेच्या केंद्रस्थानी स्थान मिळविले. ग्रामीण भागात प्रत्येक जण या आजाराचा, घडणाऱ्या घडामोडींचा आणि त्याच्या उच्चाटनाबाबत आपापल्या परीने अंदाज बांधत आहे. एसटी माझ्या दारातनं धावलं, तवाच कोरोना संपला म्हणायचा ही राज्यमार्गाशेजारी राहणाऱ्या एका वृद्धाने व्यक्त केलेली प्रतिक्रियाच सारे काही स्पष्ट करणारी आहे.

संसर्गातून पसरणाऱ्या कोरोनाने विश्‍व व्यापले आहे. ग्रामीण भागातील प्रमाण थोडे कमी आहे, इतकेच काय ते. पण, प्रत्येकाच्या तोंडून कोरोनाच्याच कथा ऐकायला मिळत आहेत. गडहिंग्लज-आजरा मार्गावरील एका गावातील औषधाचे दुकान. औषधे घेण्यासाठी आलेल्यामध्येही कोरोनाचाच विषय. रांगेत उभारलेल्या आजोबांना विचारले. कधी जायचा गा, ह्यो कोरोना. माझ्या दारातनं एसटी धावलं तवाच कोरोना संपला म्हणायचा, हे आजोबांनी दिलेले उत्तर सध्याची परिस्थिती सांगण्यास पुरेसे ठरेल. दारातून रोज धावणाऱ्या बस पाहून सरावलेल्या त्यांच्या नजरेला दीड महिन्यापासून बसचे दर्शन दुर्लभ झाले आहे. त्यामुळेच आयुष्यात प्रथमच असे घडल्याची पुष्टीही त्यांच्याकडून जोडली गेली.

रस्त्याकडेला एखादे कुत्रे, मांजर पडलेले असेल तर दुर्गंधी येऊ नये म्हणून महिला नाकाला पदर लावत होत्या. पण, आता शेताकडे, दूध घालण्यासाठी जाणाऱ्या महिलाही खबरदारी म्हणून तोंडाला मास्क बांधत आहेत. पण, जनावराचं मुसकं घातल्यासारखं वाटतंय म्हणून पदर बांधत असल्याचे सांगणाऱ्या महिलाही काही कमी नाहीत. कोरोनाने गावच्या सीमा बंद केल्या. त्यामुळे शहरात भाजीपाला विकायला जाणारे आता गावातच गल्लोगल्ली फिरू लागले आहेत. भाजीची बुट्टी डोकीवर ठेवताना "आता माळवं गावातच खपालयं' हे समाधानाने सांगणाऱ्या चेहऱ्याआडचा पाच-दहा रुपये चढ मिळविण्याचा बेरकीपणाही लपेनासा झाला आहे. शेतात कामासाठी जाणाऱ्या महिलात घरात, गावात घडणाऱ्या घटना, टीव्हीवरील मालिकांसोबत कोरोनाचा विषय हमखास चर्चेला येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT